यावर्षी परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. आता या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे सरकारने पुणे आणि नाशिक विभागातील दहा जिल्ह्यातील सहा लाख ३२ हजार ८९३ शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांना ६७५ कोटी ४५ लाख १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाढीव मदत दिली.
राज्य सरकारने बुधवारी मदत देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला आहे.
Livestock Market : बंदी उठवल्याने जनावरे बाजार पूर्ववत, शेतकऱ्यांना दिलासा..
याआधी शेतकऱ्यांना पाच हजार ६६१ कोटी ३९ लाखांची मदत दिली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळाली आहे, त्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
'ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंतिम हप्ता मिळणेसाठी तातडीने ऊस दर नियंत्रण स्थापन करा'
याबाबत सगळी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. यामुळे या शेतकऱ्यांना आता लवकरच रक्कम मिळणार आहे. यामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
कृषी जागरणतर्फे 12 जानेवारी IYOM 2023 साजरे करण्यासाठी मेगा इव्हेंट आयोजित, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला राहणार उपस्थित..
घरात फक्त दोनच बल्प आणि बिल आलंय 34 हजार, महावितरणचा अजब कारभार
ब्रेकींग! राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारावर खुनाचा आरोप, कोर्टाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा..
Share your comments