1. पशुधन

Livestock Market : बंदी उठवल्याने जनावरे बाजार पूर्ववत, शेतकऱ्यांना दिलासा..

काही महिन्यांपासून राज्यासह देशात लम्पी आजार आला आणि शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली तर जनावरांचे बाजार देखील बंद करण्यात आले. आता नाशिक जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) कमी झाल्याने जनावर बाजारावरील (Livestock Market Ban) बंदी उठवली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Livestock Marke ban lifted

Livestock Marke ban lifted

काही महिन्यांपासून राज्यासह देशात लम्पी आजार आला आणि शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली तर जनावरांचे बाजार देखील बंद करण्यात आले. आता नाशिक जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) कमी झाल्याने जनावर बाजारावरील (Livestock Market Ban) बंदी उठवली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी निर्णय घेतला आहे. यामध्ये यात्रा दरम्यान बैलगाडी शर्यतीवरील (Bullock Cart Race) बंदी आणि जनावरांच्या बाजाराला परवानगी दिल्याने नागरिकांना शर्यतीचा आनंद घेता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तसेच गुरांची वाहतूक यावर देखील निर्बंध होते. केंद्र सरकारच्या वतीने घालून दिलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. जनावरांच्या बाजारात लम्पी आजार वाढण्याचा धोका होता. यामुळे यावर आळा घालणे गरजेचे होते.

जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे

नाशिक जिल्ह्यातील घोटी, सिन्नर या ठिकाणी बैल बाजार भरवला जात होता. या वेळी खरेदी-विक्रीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत होती. मात्र यावर बंदी आल्याने ही उलाढाल ठप्प झाली होती. यामुळे ही बंदी उठवण्याची मागणी केली जात होती.

असे असताना आता जिल्हाधिकारी यांनी आता बंदी उठविल्याने पुन्हा एकदा जनावरांचा बाजार जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी गजबजलेला पाहावयास मिळणार आहे. यासाठी काही नियम देखील दिले आहेत, यामध्ये वाहतुकीसाठी आरोग्य प्रमाणपत्र, आरोग्य दाखला बाळगणे आवश्‍यक आहे. तसेच वाहतुकीसाठी २८ दिवस आधी लसीकरण झाले असावे.

आमदारसाहेब लग्नासाठी तुमच्या सर्कलमध्ये पोरगी बघा!! लग्नासाठी मुलगी मिळेना, तरुणाचा थेट आमदाराला फोन...

पशू बाजारात प्रदर्शन बैलगाडा शर्यत आयोजकांना टॅगिंग पॉलिसीची खात्री गरजेची. इत्यादी नियम लावले गेले आहेत, दरम्यान राज्यात या आजाराने अनेक जनसावरे दगावली, याचा फटका देखील अनेकांना बसला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंचा अपघात, दुचाकीने दिली धडक
ब्रेकिंग! कारखाना घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी
दर 10 तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या! मायबाप सरकार याकडे लक्ष द्या...

English Summary: Livestock Market: With the ban lifted, restored, farmers.. Published on: 11 January 2023, 01:40 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters