राज्य शासनाने शासकीय दूध खरेदी दरात लिटरमागे दोन रुपयांनी कपात केली आहे तसा आदेशही राज्य सरकारने काढला आहे. दरम्यान, वितरकांच्या टप्पे निहाय कमिशन रद्द करून सरसकट लिटरमागे तीन रुपये कमिशन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
दुधाच्या खरेदीदरात गेल्या दोन वर्षांत तीनदा वाढ करण्यात आली होती. सुरवातीला दोनदा प्रती लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली. तर त्यानंतर जून 2017 मध्ये आणखी तीन रुपयांची दरवाढ करण्यात आली. गाय आणि म्हैशीच्या दूध दरात ही वाढ करण्यात आली होती. त्यामुळे गायीचे दूध प्रति लिटर 27 रुपये आणि म्हशीचे दूध प्रती लिटर 36 रुपये या दराने खरेदी करणे अपेक्षित होते. ही दरवाढ सरकारी, सहकारी आणि खासगी दूध संघांना बंधनकारक होती.
संबंधित बातमी वाचण्यासाठी: दूध दरवाढ अंमलबजावणी आजपासून
दुध दर प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने नुकतीच बैठक घेऊन दूध दराबाबत आढावा घेतला. या बैठकीनंतर राज्यातील दूध दरात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
गाय दुध: 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ 25 रुपये दर
म्हैस दुध: 6 फॅट आणि 9 एसएनएफ 34 रुपये दर
आरे भूषण दुध विक्री मुंबई 37 रुपये मुंबई वगळून 36 रुपये
संबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी लिंक: शासकीय दुध योजनेंतर्गत दुध खरेदीच्या दरात व वितरक कमिशन दरामध्ये सुधारणा करण्याबाबत
यापूर्वी वितरकांना टप्पेनिहाय अडीच ते साडेतीन रुपये कमिशन दिले जात होते. आता टप्पे रद्द करण्यात आले असून सरसकट तीन रुपये कमिशन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Share your comments