1. बातम्या

लाल भेंडी बनवेल शेतकऱ्यांना मालामाल

लाल भेंडीची लागवड केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.पारंपरिक हिरव्या भेंडीच्या लागवडीपेक्षा लाल भेंडीची लागवड ही जास्त उत्पन्न देणारी आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
लाल भेंडी

लाल भेंडी

शेतकरीबंधू भरघोस उत्पन्न आणि दर्जावान पीक येण्यासाठी पारंपरिक शेतीबरोबर अत्याधुनिक शेतीचीसुद्धा कास धरत आहे. तसेच पीक पद्धतीत बदल करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. शेतीविषयक तज्ज्ञ शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा कसा होईल याचे मार्गदर्शन देत असतात. शिवाय कृषी शास्त्रज्ञही शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करत आहेत.

अशीच एक बातमी मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. जिथे लाल भेंडी शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरत आहेत. भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यात असलेल्या परासिया जिल्ह्यातील कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना पीक उत्पादनात नवीन तंत्रांचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यातूनच प्रेरणा घेऊन जटाछापर येथील दोन शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीतून लाल भेंडीची लागवड करून चांगला नफा कमावला आहे.


लाल भेंडीची लागवड केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.पारंपरिक हिरव्या भेंडीच्या लागवडीपेक्षा लाल भेंडीची लागवड ही जास्त उत्पन्न देणारी आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. काही फळभाज्या आपल्यातील गुणवैशिष्टयांनी म्हणजेच आपल्या नावाने, आपल्या चवीने आपलं वेगळेपण दर्शवत असते. लाल भेंडीचं पण असच आहे.

एक पाऊल टाका पुढे! ज्वारी पिकवा आणि करा ज्वारीवर प्रक्रिया, कमवा चांगला नफा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चनुसार, लाल भेंडी ही आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे लाल भेंडी ही खायला स्वादिष्ट आणि आरोग्यदायी मानली जाते,तिच्यात अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. शरीराची प्रतिकारशक्तीही वाढवण्यास ही भाजी मदत करते. तसेच शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार लाल भेंडीला इतर भाज्यांच्या तुलनेत रोगांचा धोका कमी असतो. मात्र या पिकाला लाल कोळ्याचा धोका अधिक असतो.

याचा थवा पिकाच्या झाडाच्या पानाखाली राहतो आणि हळूहळू पानांचा रस शोषून घेतो. परिणामी, वनस्पती सुकते आणि पिवळी पडते. आणि झाडाची वाढही खुंटते. यावर तोडगा म्हणून शास्त्रज्ञांनी लाल भेंडीच्या पिकात डायकोफॉल किंवा सल्फर पिकावर शिंपडण्याचा सल्ला दिला आहे. सध्या लाल भेंडीची लागवड मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूप चांगले उत्पन्न मिळवून देणारी ठरत आहे. सेंद्रिय पद्धतीने याची लागवड केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट तर होतेच, पण त्याचे अनेक आयुर्वेदिक फायदेदेखील आहेत.

महत्वाच्या बातम्या:
"राजीव गांधी कृषिरत्न हा पुरस्कार म्हणजे मातीमध्ये राबणाऱ्या अन्नदात्याचा सन्मान-श्री.अमर तायडे(केवीके घातखेड,अमरावती)
हनुमान चालिसानंतर आता शेतकरी चालीसा, तुमचे भोंगे बंद करा असे म्हणत शेतकऱ्यांनी ...

English Summary: Red ladyfinger will make goods for farmers Published on: 05 May 2022, 10:52 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters