काही दिवसांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. यामुळे मेटे यांच्या या अपघाताची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. तपासातून कार चालक दोषी असल्याचे समोर आले आहे.
अपघात चालकाने अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे झाल्याचे समोर आले. यामुळे आता चालक एकनाथ कदमविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता एकनाथ कदम याला अटक करण्यात आली आहे.
चालकाने अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघात झाल्याचे समोर आले. तीन महिन्यांपूर्वी (१४ ऑगस्ट) मुंबई-पुणे महामार्गावर कार अपघातात विनायक मेटे यांचा मृत्यू झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
राजू शेट्टींनी रस्ता केला आणि 2 कॅन दुधाचे झाले 16 कॅन दूध, गावकऱ्यांच्या वैभवात पडणार भर
दरम्यान, चौकशीत विनायक मेटेंची गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. तसेच तज्ज्ञांची एक समिती तयार करून त्यांच्याकडूनही याप्रकरणी मते घेतली गेली. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मेटे बीडकडून मुंबईकडे येत होते.
शेतकऱ्यांनो शेअर्सवरील साखरेच्या मोहापाई हजारो रुपयांचे नुकसान का करुन घेता?
पहाटे पाच वाजता हा अपघात झाला होता. चालकाने मेटे यांना तासभर मदतच मिळाली नसल्याचा आरोप केला होता. एकनाथ कदम हा मेटे यांची कार १४०-१५० किमीच्या वेगाने चालवत होता. भातन बोगद्याजवळ आल्यावर त्याने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी अपघात झाला.
महत्वाच्या बातम्या;
उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आंदोलकांनी पेटवला, ऊसदर आंदोलन पेटले..
ब्रेकिंग! नितीन गडकरी यांची तब्येत बिघडली
उस दरासाठी आता दिवसेंदिवस शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत
Share your comments