1. बातम्या

"मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो"; अपघाताबाबत थरारक माहिती समोर

Vinayak Mete Accident News: शिवसंग्राम पक्षाचे (Shiv Sangram Party) अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं कार अपघातात निधन झाले. मेटे यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Vinayak Mete Accident News

Vinayak Mete Accident News

Vinayak Mete Accident News: शिवसंग्राम पक्षाचे (Shiv Sangram Party) अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं कार अपघातात निधन झाले. मेटे यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली. खालापूर टोलनाक्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक मेटे हे त्यांच्या फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 या गाडीने मुंबईकडे निघाले होते. मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

ब्रेकिंग! शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघातात जागीच मृत्यू

"मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो"

एकनाथ कदम (Eknath Kadam) हे मेटे यांचे सहकारी चालक देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. कदम यांच्याशी एका वृत्त वाहिनीनं संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडं येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकनं कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही.

मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो. मात्र, कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर त्याठिकाणी अँम्ब्युलंस आली. 100 नंबरला आम्ही फोन केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही.

एकनाथ कदम यांनी सांगितल की, अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते. मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे.

Rakesh Jhunjhunwala: 'शेअर मार्केट किंग' राकेश झुनझुनवाला यांचे निधन

English Summary: Vinayak Mete Accident News Published on: 14 August 2022, 01:29 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters