1. बातम्या

RBI ची घोषणा : कर्जाच्या हप्त्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुभा; कृषी क्षेत्राकडून आरबीआयला अपेक्षा


मुंबई - देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. तर कर्जदारांनाही मोठा दिलासा दिला असल्याची माहिती गव्हर्नर शक्तीदास कांत यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान मान्सूनच्या सकारात्मक अंदाजामुळे कृषी क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असे देखील ते म्हणाले.  कोरोना व्हायरसमुळे अनेक उद्योग धंदे आणि सर्व क्षेत्रातील कामे बंद पडली होती. परंतु कृषी क्षेत्रातील कामे चालूच होती. यंदा मॉन्सून चांगला असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असल्याने कृषी क्षेत्रातील उत्पन्न वाढेल असा अंदाज आहे.

दरम्यान  यावेळी डाळीच्या वाढत्या किंमती हा चिंतेचा विषय असल्याची माहितीही शक्तीकांत दास यांनी दिली. महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असल्याचे ते म्हणाले.  लॉकडाऊनमुळे बाजारातील मागणीत घट आली आहे. संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरू आहे. सर्वच क्षेत्रांना कोरोना व्हायरसमुळे मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनचा सेवा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. बाजारातील मागणीतही ६० टक्क्यांची घट झाल्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी यावेळी सांगितले.

अशा स्थितीत कर्जदारांना आरबीआयने दिलासा दिला आहे. कर्ज न भरण्याची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जदारांना हा दिलासा देण्यात आल्याची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये  ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे.


दरम्यान २०२० -२१ या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी हा शून्याच्या खाली राहिल असा अंदाजही दास यांनी वर्तवला आहे. रेपो रेटमध्ये ४० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. रेपो रेट ४.४ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर करण्यात आला आहे.  या कपातीमुळे कर्जावरील व्याज कमी होणार असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे.  महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे. संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरू असल्याचे शक्तीकांत दास यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे बाजारातील मागणीत घट आली आहे. संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरु आहे, असंही ते म्हणाले.  सर्वच क्षेत्रांना कोरोना व्हायरसमुळे मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनचा सेवा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य लोकांवर कर्जाच्या हप्त्याचं ओझं वाढू नये यासाठी ते भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. ती मुदत आता आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. आधी मार्च, एप्रिल, मे साठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters