1. बातम्या

रमेश माईनकर - डिजिटल तंत्रज्ञानाचे कृषिदूत

खेड्यातील कुटुंब, घरची शेती आणि सोबत नोकरी

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रमेश माईनकर - डिजिटल तंत्रज्ञानाचे कृषिदूत

रमेश माईनकर - डिजिटल तंत्रज्ञानाचे कृषिदूत

खेड्यातील कुटुंब, घरची शेती आणि सोबत नोकरी या सर्व गोष्टी सांभाळून महाराष्ट्रातील १७,००० शेतकरी मित्रांना व्हॉट्सऍप सारख्या मेसेंजर अँपच्या माध्यमातून नुसतं एकत्र न करता त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम सर गेली अनेक वर्षे निस्वार्थीपणे अविरत आणि अगदी मनापासून करत आहेत.

आपल्या कृषिप्रधान राष्ट्रात मागील अर्ध्या तपापासून आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याचा शेतीमधील वापर हा वाढत गेला. सोशल मीडियाचा वापर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे पण शेती क्षेत्रावर त्याचा परिणाम खूप मोठा आहे. डिजिटल मीडियाचा दुरुपयोग होत असताना शेतकरी मित्राचं आयुष्य

यातून बदलू शकत ही संधी ओळखून संधी शेतकऱ्यांसाठी काम सुरू केलं.द्राक्ष बागायतदार यांचे टेलीग्राम आणि व्हाट्सअँप (WhatsApp)Telegram and WhatsApp of Grape Growers#तासगाव_चमन ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य असे मार्गदर्शन कसे मिळेल याकडे लक्ष दिले आहे.सदर कोणत्याही ग्रुप वर चुकीची माहिती प्रसारित केली जात नाही याची काळजी ते लक्षपूर्वक स्वतः घेतात. या कामासाठी ते रोजचा ५ तास वेळ देतात. एवढं प्रचंड काम ते विना मोबदला कोणत्याही

दमडीची अपेक्षा ठेवत नाहीत. ही या काळातील खूप मोठी निःस्वार्थ सेवा आहे असं मी म्हणेल.मी सरांना कृषीतील एक निष्णात आणि निस्वार्थी कर्मयोगी म्हणेल. शेती क्षेत्रात मी मागेच आधुनिक भोंदू बाबा यावर एक लेख लिहला होता.याच क्षेत्रात हा असा निष्काम कर्मयोगी पण आहे.सोशल मीडियाच्या जमान्यात असली खरीखुरी नाणी भेटतात आपणही त्यात काम करतोय हे आज भेटून अनुभवलं ही एक पर्वणीच होती..

 

- गणेश नाझीरकर, फ्रुटवाला बागायतदार

English Summary: Ramesh Mainkar - Farmer Ambassador of Digital Technology Published on: 01 August 2022, 04:33 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters