आजपासून विधानसभेसह विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. कधी खेळीमेळीत तर कधी जोरदार बाचाबाची करत हे अधिवेशन सुरू आहे. यावेळी ‘राहुल, इथंपण तू आडवा का मला,’ असा मिश्किल सवाल करत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दौंडचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांची फिरकी घेतली.
यामुळे सध्या याची चर्चा झाली आहे. अधिवेशनात दौंडचे आमदार राहुल कुल यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यवत पोलिस ठाण्याच्या संदर्भातील प्रश्न ते विचारत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मात्र नियमित कामकाज घेण्याचा आग्रह हेाता. यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला.
प्रत्येकाला एकेक मिनिटे देत आपण औचित्याचा मुद्यांचे प्रश्न १५ मिनिटांत संपवू, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सांगितले. मात्र, त्यास अजित पवार यांनी विरोध दर्शविला. यामुळे अजित पवारांनी तसे वक्तव्य केले.
आता होणार राडा! रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये येणार..
दरम्यान, विधान परिषदेत मात्र याआधी कधीही न पाहायला मिळालेले ऐतिहासिक चित्र दिसून आले. मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनेचे आहेत. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे हे देखील शिवसेनेचे आहेत.
यामुळे हे अधिवेशन इतर अधिवेशनापेक्षा काहीसे वेगळे आहे. सध्याच्या राजकीय पेचामुळे एकाच पक्षातील दोन नेते एकमेकांसमोर उभे असल्याचे चित्र दिसून आले. असे असताना विरोधकांनी पायऱ्यांवरच घोषणाबाजी केली आहे. ५० खोके एकदम ओके. आले रे आले गद्दार आले, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्याचे पाहायला मिळाले. यामुळे याची चर्चा सुरु आहे.
काय ते कार्यकर्त्यांवरच प्रेम!! उदयनराजेंचा नादच खुळा, कार्यकर्त्याला तोंडाने भरवला पेढा..
शिंदे गटाच्या बंडाचं केंद्र असलेल्या गुवाहाटीचा संदर्भ देत महाविकास आघाडीच्या (MahaVikas Aghadi) नेत्यांनी घोषणा दिल्या. “गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!”, या घोषणेने सर्वाचंच लक्ष वेधलं.एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. यामुळे सरकार पडले.
महत्वाच्या बातम्या;
मोदी सरकारची मोठी घोषणा! आता कृषी कर्जावरील व्याजात मिळणार मोठी सूट
Farming Technique: आता करा जमिनीखाली आणि जमिनीवर दुहेरी शेती, ही पद्धत अवलंबल्यास मिळेल बक्कळ पैसा..
पन्नास खोके एकदम ओक्के! अधिवेशनात विरोधकांच्या घोषणेची राज्यात चर्चा..
Share your comments