सध्या राज्याचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी खताच्या वाढलेल्या किमंतीवरून विरोधकांनी मांडलेल्या प्रश्नांना कृषीमंत्र्यांकडून उत्तर दिले जात नसल्याने सभागृहात गोंधळ झाला.
केंद्राने खताचे दर न वाढवता दर स्थिती राहणार असल्याचे सांगितले. वास्तविक सरकारने सबसिडी देऊन शेतकऱ्याच्या जीवावर नफेखोरी केली. यामुळे दर वाढले आहेत.
त्यावर सुद्धा उत्तर आलं नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती कमी झालेल्या असताना राज्यातही खताच्या किमती २० टक्क्यांनी कमी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
केंद्राने खताच्या किमंती नियंत्रित केल्यानंतर राज्यातील खतांच्या किमंती कमी झाल्या पाहिजे. पण तसं कुठेही होताना दिसत नाही. तसेच अनेक ठिकाणी बोगस बियाणांच्या घटना होत नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १४ वा हफ्ता कधी जमा होणार? अखेर तारीख आली समोर..
खत आणि बियाण्यांबाबत सरकारच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काॅंग्रेसचे आमदार आणि कृषीमंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली. सध्या यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.
'सरकारचा एक दिवस बळीराजासाठी, बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी'
बोगस बियाणे, खते, कीटकनाशकेविषयक तक्रारी व्हॉट्सअँपवर नोंदवता येणार, कृषी मंत्र्यांचा निर्णय...
ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारी कर्ज कसे घ्यायचे? सर्वकाही जाणून घ्या..
Share your comments