सध्या आंबे, जांभूळ, करवंद याचा सिजन सुरू आहे. यामध्ये आंब्यांना चांगले दर मिळत आहे. पण अशात आंब्यांना जांभळाने (Jambhul Fruit) मागे टाकले आहे. कारण आंब्यापेक्षा जांभळं महाग झाली आहेत.
यामुळे ज्यांच्याकडे एक जरी झाड असलं तरी त्याचे चांगले पैसे होत आहेत. विशेष म्हणजे एक जांभूळ दहा रुपयाला मिळत असून, किलोचा दर चारशे रुपयांवर पोहचला आहे. यामुळे कधी नव्हे तर एवढा भाव जांभळाने खाल्ला आहे.
त्यामुळे जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने आवक देखील कमी झाली आहे.
कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी आडवला मुंबई- आग्रा महामार्ग..
त्यामुळे यंदा जांभळाला चांगला दर मिळत आहे. काळेभोर जांभूळ डोळ्यासमोर आलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. अनेक आजारांवर देखील ते परिणामकारक आहे. मात्र आता त्याच जांभळाला सोन्याचा दर मिळतोय.
विशेष म्हणजे एक किलोमध्ये येणाऱ्या जांभळांची संख्या पाहिली तर एक जांभूळ दहा रुपयाला पडतोय. छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडीवर विक्रीसाठी आलेल्या दोन टोपल्या प्रत्येकी 16 हजार रुपयाला विकत आहेत. यामुळे ते सर्वसामान्यांना लोकांना परवडत नाही.
पुण्यासाठी आता अमित शहा यांची मोठी घोषणा, पुराचा धोका कमी करण्यासाठी ७ शहरांसाठी २५०० कोटी...
असे असले तरी एवढा दर असून देखील ही जांभळं तासाभरात हातोहात विकतायत. यामुळे येणाऱ्या काळात जांभळाची चार झाडे जरी लावली तरी चांगले पैसे तुम्हाला मिळतील.
येत्या आठवड्याभरात ऊसदर नियंत्रण समिती स्थापन करू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...
माॅन्सूनची वाट रखडली, शेतकरी चिंतेत...
शेतीसाठी सरकार करणार मदत, 15 लाखांची करणार मदत, असा करा अर्ज..
Share your comments