1. बातम्या

94 कोटींचा प्रस्ताव देईल 'या' शेतीच्या जोड धंद्याला नवसंजीवनी, राज्य सरकारचा हा आहे जबरदस्त प्लानिंग

भारत हा कृषिप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था आणि बहुसंख्य लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे शासनाकडून कृषी क्षेत्रासाठीविविध प्रकारच्या योजनाआखल्या व त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
proposal declare of 94 crore rupees for developing goat rearing bussiness

proposal declare of 94 crore rupees for developing goat rearing bussiness

भारत हा कृषिप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था आणि बहुसंख्य लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे शासनाकडून कृषी क्षेत्रासाठीविविध प्रकारच्या योजनाआखल्या व त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

जेणेकरून कृषी क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळून कृषी क्षेत्रा सोबतच शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. कृषी क्षेत्रा सोबत शेतकरी पशुपालन, शेळीपालन यासारखे जोड व्यवसाय करतात. यासाठीसुद्धा विविध प्रकारच्या योजना सरकारने आखल्या असून शेतकऱ्यांना या बाबतीत आर्थिक मदत करण्यात येत आहे. जेणेकरून शेतीसोबत शेतीशी निगडित जोडधंद्यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी हा त्यामागचा उद्देश  आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाच्या प्रक्षेत्र बोंदरी येथे गोटबँकेची स्थापना करण्यात येणार असून नागपूर जिल्ह्यातील 500 महिलांना यामध्ये सहभागी करून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. असेच कारखेडा गोट प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने  गोट बँकेच्या संकल्पनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. मंत्रालयामध्ये झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या  आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.

 काय म्हणाले सुनील केदार?

या आढावा बैठकीमध्ये बोलताना सुनील केदार म्हणाले की,माडग्याळ मेंढी केंद्र शासनाचे मानांकन प्राप्त झाले आहे. ही जात महाराष्ट्रात प्रसिद्ध असून इतर देशातून उच्च जातीच्या शेळ्या राज्यात आणण्यात येणार आहेत.

लोकरीचे विविध प्रकारचे उत्पादने निर्माण करून विक्रीला उपलब्ध करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना  जोडधंदा सुरू करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे यावेळी सुनील केदार यांनी सांगितले त्यासोबतच पशुपालकांना पर्यंत शेळी,मेंढी विमा योजनेची माहिती पोहोचवण्यासाठी सर्व प्रक्षेत्र व्यवस्थापकासह विभागाने प्राधान्य द्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या महा विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली झाली असून आता महामंडळाच्या अधिकृत भांडवल शंभर कोटी रुपये झाले आहे आणि वार्षिक उलाढाल 40 कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे.

 94 कोटी रुपये खर्चून होणार महाराष्ट्र शेळी मेंढी विकास मंडळाचे बळकटीकरण

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावर बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी 94 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत.  या प्रस्तावित रकमेतूनपशुधन खरेदी करणे,नवीन वाडे बांधकाम,कृत्रिम रेतन कार्यक्रम राबवणे, मुरघास निर्मिती, यंत्रसामग्री, शेळी मेंढी पालन प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम, प्रशिक्षणार्थी निवासी इमारत बांधकाम व शेतकरी निवास स्थान जमीन विकास, सिंचन सुविधा, विहीर, पाईप लाईन आणि इलेक्ट्रिक मोटर इत्यादी, ट्रॅक्टर ट्रॉली, कृषी अवजारे व चारा कापणी यंत्र, वैरण साठवणूक गोडाउन, सिंचन सुविधा विहीर, शेळी मेंढी खाद्य कारखाना कार्यालय इमारत बांधकाम,

आवश्यक साधनसामग्री, अंतर्गत रस्ते, अल्ट्रासोनोग्राफी युनिट, फिरते शेळी मेंढी चिकित्सालय वाहन, खरेदी फॉडर ब्लॉक मेकिंग युनिट, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Sale Management In Goat Rearing: शेळी पालकांनो! शेळ्यांचे विक्री व्यवस्थापनाचे तंत्र अवगत असेल तरच मिळेल नफा

नक्की वाचा:तुमच्याकडे कॉलेजची डिग्री नाही तर नो टेन्शन! आता सरकार देणार तुम्हाला 30000 प्रतिमहिना पगाराची नोकरी- मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

नक्की वाचा:चक्रीवादळ आसनी: चक्रीवादळाचा मार्ग बदलला, महाराष्ट्रावर काय परिणाम, कुठे पडणार पाऊस?

English Summary: proposal declare of 94 crore rupees for developing goat rearing bussiness Published on: 12 May 2022, 01:37 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters