1. पशुधन

Sale Management In Goat Rearing: शेळी पालकांनो! शेळ्यांचे विक्री व्यवस्थापनाचे तंत्र अवगत असेल तरच मिळेल नफा

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
sale management is so important in gotat rearing to give advantage

sale management is so important in gotat rearing to give advantage

शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी पशूपालन, शेळीपालन यासारखे व्यवसाय करतात. पशुपालनाचा विचार केला तर यामध्ये दुधाचे उत्पादन हा एक प्रमुख आर्थिक स्त्रोत असतो. परंतु त्या दृष्टिकोनातून शेळीपालनाकडे पाहिले तर शेळ्यांच्या विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळत असते.

तसे आपल्याला माहित आहेच की, व्यवसाय कुठलाही राहिला परंतु  आपल्या व्यवसायातील तयार उत्पादन किंवा आपण विक्री करत असलेली वस्तू एक उत्तम नियोजनाने बाजारपेठेत सादर करून विकता येणे हे फार मोठे कौशल्य आहे. तुमच्याकडे विक्री व्यवस्थापन उत्तम असेल तर तुम्ही बाजार पेठ काबीज करायला वेळ लागू देत नाही. प्रत्येक व्यवसायाच्या उत्पादनांनुरूप विक्री व्यवस्थापनाचे वेगवेगळे पैलू असतात. या  पैलूंचा सांगोपांग अभ्यास आणि नियोजन करून विक्री व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असते. हीच सगळी बाब शेळीपालनामध्ये सुद्धा लागू होते. नुसते शेळीपालनाला महत्त्व नसून त्या शेळ्या बाजारांमध्ये व्यवस्थित विक्री करता येणे फार गरजेचे आहे. शेळी पालन विक्री व्यवस्थापनामध्ये देखील विविध अंगांनी अभ्यास ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून उत्तम विक्री व्यवस्थापनातून अधिकचा नफा मिळवता येणे शेतकऱ्यांना शक्य होईल. या लेखामध्ये आपण शेळ्यांच्या च्या विक्री व्यवस्थापनाविषयी थोडक्यात माहिती घेऊ.

 शेळ्यांची उत्तम विक्री व्यवस्थापन तंत्र

 जर आपण शेळ्यांचे विक्री व्यवस्थापनाचा अभ्यास केला तर यामध्ये विविध प्रकारचे पैलू आणि  संधी दिसून येतात. त्या म्हणजे

1- मांसाची निर्यात करून

2- बकरी ईदच्या नियोजन करून बोकड तयार करणे.

3- तसेच फक्त मांसासाठी शेळीपालन

4-तसेच दूध व दुधाच्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी जसे की दही,चीज, साबण इत्यादी

5- प्रदर्शनासाठी तसेच पैदाशीसाठी

6- धुलीवंदन, 31 डिसेंबर, अमावस्या इत्यादी प्रसंगांमध्ये अथवा सणांमध्ये मटणासाठी शेळ्यांना चांगली मागणी असते त्यादृष्टीने व्यवस्थापन करणे.

7- तसेच लेंडीखत मिळावे यासाठी शेळीपालन फायदेशीर ठरते.

 या काही टिप्स करतील फायदेशीर शेळीपालनात मदत

1- शेळीपालनात ला सुरुवात करायची तर जास्तीत जास्त 20 शेळ्या व एक बोकड घेऊन करावी.

2- शेळ्यांची निवड करताना प्रामुख्याने ती स्थानिक आणि दोन करडे देणारी गाभण शेळीची निवड करावी.

3- योग्य नियोजन ठेवावे व घरचा  चाऱ्याची व्यवस्था करावी.

4- बकरी ईद व पैदास बोकड उत्पादनाचे विक्री नियोजन करावे.

5- बोकडांच्या वजन वाढीवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

6- व्यवस्थित दररोज निरीक्षण करून शेळ्‍यां विषयाच्या नोंदी नोंदवहीमध्ये ठेवणे.

7- जंतनिर्मूलन व नियमित लसीकरण करण्याकडे लक्ष पुरवावे.

8- स्वच्छ मटण निर्मिती व निर्यातीवर भर द्यावा.

9- ज्या शेळ्या काही उपयोगाच्या नाहीत त्यांना कळपातून काढून टाकणे गरजेचे असते.

10- शेळ्यांचे व्यवस्थापन स्वतः करणे खूप गरजेचे आहे.

 शेळी पालन व्यवसाय का आहे फायद्याचा?

1- शेळी हा प्राणी उत्तम पुनरुत्पादन क्षमता असलेला व बहुउद्देशीय प्राणी आहे.

2- स्वादिष्ट मटन, कधीही कमी न होणारी लोकप्रियता व खाण्यासाठी कोणताही धार्मिक अडसर नाही.

3- बऱ्याच तरुणांची आर्थिक परिस्थिती बेताची असते शिवाय नोकरीच नसते अशा तरुणांसाठी हा व्यवसाय एक संजीवनी देणारा आहे.

4- कमी प्रतीच्या चाऱ्याचे वजन वाढण्यामध्ये रुपांतर करण्याचा महत्त्वाचा गुण शेळ्यामध्ये असतो.

5- शेळ्या काटक असून त्यांच्यामध्ये चांगली रोगप्रतिकारक शक्ती असते. तसेच इतर जनावरांचा विचार केला तर त्यांच्या तुलनेत अगदी उष्ण भागात देखील तग धरून राहू शकतात.

6- हा व्यवसाय कमीत कमी खर्चात व आपल्याकडे उपलब्ध गोष्टींचा उपयोग करून आणि थोडेसे तांत्रिक ज्ञान वापरून नक्कीच फायद्याचा करता येतो.

7- शेळीच्या मांसाच्या निर्यातीत संधी वाढत असून शेळीपालनाला महत्त्व आहे.

8- उत्तम मांसाची व औषधी गुण असणाऱ्या दुधाची गरज भागवण्यासाठी शेळीपालन उपयुक्त आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:तुमच्याकडे कॉलेजची डिग्री नाही तर नो टेन्शन! आता सरकार देणार तुम्हाला 30000 प्रतिमहिना पगाराची नोकरी- मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

नक्की वाचा:शेतीला उत्तम फायदेशीर जोडधंदा!शेतीला अनुसरून व्यवसायला उत्तम पर्याय म्हणजे बटेर पालन-डॉ.शरद कठाळे सरांच्या मार्गदर्शनातुन

नक्की वाचा:नात्याचा प्रेमळ बंध! बिबट्याचा बछडा आठवडाभर दीड वर्षाच्या 'तन्वी'च्या अंगाखांद्यावर खेळला, वनविभागाच्या ताब्यात देताना सर्वांना अश्रू अनावर

English Summary: sale management is so important in gotat rearing to give advantage Published on: 11 May 2022, 12:14 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters