15 ऑगस्ट रोजी देशासाठी भाषण करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून भ्रष्टाचार बंद करण्यासाठी काम करायचे असल्याचे सांगितले होते. असे असताना आता भारतीय वंशाचे अमेरिकेत असलेले रिचमंड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट लोकेश व्युरु (Richmond Gastroenterologist Lokesh Vyuru) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल केला आहे.
यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. भारतीय वंशाचे असलेल्या डॉक्टरने नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी (Andhra Pradesh Chief Minister Y.S. Jagan Mohan Reddy ) आणि उद्योगपती गौतम अदानी (industrialist Gautam Adani) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, भ्रष्टाचार आणि पेगासस हेरगिरीसह अनेक गोष्टींबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाकडून या प्रकरणी या तिन्ही नेत्यांना समन्स बजावण्यात आले आहे. तसेच यामध्ये अनेक नावे आहेत.
धक्कादायक! कमी गुण दिल्याने विद्यार्थ्यांची शिक्षकांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल..
हा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी कोणत्याही कागदपत्राशिवाय आंध्र प्रदेशातून आलेल्या भारतीय-अमेरिकन डॉक्टरकडून केस दाखल केली गेली आहे. यामुळे न्यूयॉर्कचे वकील रवी बत्रा यांनी या केसला निरर्थक केस असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्यासह अनेकांकडून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कॅश ट्रान्स्फर केली जात आहे. यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदींचे पहिल्यांदाच असे नाव आल्याने मात्र चर्चा सुरू झाली आहे.
केजरीवाल यांनी विश्वासदर्शक मांडला आणि विरोधी आमदार पळाले, एकही आमदार फुटला नाही...
यातील अनेक लोक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारात अडकले आहेत, असा दावा या भारतीय वंशाच्या डॉक्टरने केला आहे. या प्रकरणी न्यायालयाकडून 22 जुलै रोजी समन्स जारी करण्यात आले होते. यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
पोल्ट्रीत पुराचे पाणी शिरल्याने ८५०० कोंबड्यांचा मृत्यू, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला, चर्चांना उधाण..
आता उद्धव ठाकरेसोबत मराठा ताकद! संभाजी ब्रिगेडनंतर आता मोठ्या संघटनेने दिला पाठिंबा..
Share your comments