1. बातम्या

ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला, चर्चांना उधाण..

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Eknath Shinde Raj Thackeray

Eknath Shinde Raj Thackeray

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी ‘कृष्णकुंज’वर जाणार आहे. यामुळे ही एक मोठी भेट मानली जात आहे.

राज ठाकरे यांच्या घरातील श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री जाणार आहेत. मात्र या भेटीत इतर rajk चर्चा होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

सिल्वर ओक!! शरद पवार यांच्या बाबतीत उलगडणार अनेक किस्से, पुस्तकाचे प्रकाशन..

सध्या भाजप नेते देखील राज ठाकरे यांची भेट घेत असल्याने युतीबाबत चर्चा सुरू आहे. यामुळे भाजप, मनसे आणि शिंदे गट मिळून शिवसेनेपुढे कडवे आव्हान उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे आता ही भेट महत्वाची मानली जात आहे.

गाई म्हशी असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दीड लाख रुपये, वाचा काय आहे योजना

भाजप, शिंदे गट आणि मनसेची युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त हेात आहे. त्यामुळे आजच्या भेटीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युतीसाठी भाजप अनुकूल असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता उद्धव ठाकरेसोबत मराठा ताकद! संभाजी ब्रिगेडनंतर आता मोठ्या संघटनेने दिला पाठिंबा..
केजरीवाल यांनी विश्वासदर्शक मांडला आणि विरोधी आमदार पळाले, एकही आमदार फुटला नाही...
धक्कादायक! कमी गुण दिल्याने विद्यार्थ्यांची शिक्षकांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल..

English Summary: Meeting Chief Minister Eknath Shinde Raj Thackeray Published on: 01 September 2022, 04:39 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters