1. बातम्या

राज्यात नर्सरी हब सुरू करण्यासंदर्भात कृषी विद्यापीठाने प्रस्ताव सादर करावेत – कृषीमंत्री दादाजी भुसे

संपूर्ण राज्यामध्ये एकाच ठिकाणी फुले, फळे व भाजीपाला तसेच त्यांची रोपे, फळझाडांची कलमे इत्यादींची विक्री ची सुविधा व्हावी यासाठी सुविधा केंद्र म्हणजेच नर्सरी हब असणे फार आवश्यक आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-e sakal.com

courtesy-e sakal.com

संपूर्ण राज्यामध्ये एकाच ठिकाणी फुले, फळे व भाजीपाला तसेच त्यांची रोपे, फळझाडांची कलमे इत्यादींची विक्री ची सुविधा व्हावी यासाठी सुविधा केंद्र म्हणजेच नर्सरी हब असणे फार आवश्यक आहे.

त्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या रोपवाटिका धारकांसाठी फळे, भाजीपाला,औषधी व सुगंधी वनस्पती तसेच विविध पिकांची कलमे विक्रीसाठी त्यांना एकाच ठिकाणी सोयी सुविधा निर्माण व्हावी यासाठी राज्यात नर्सरी हब सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून संदर्भात कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावेत असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले, मंत्रालयात नर्सरी हब सुरू करण्यासंदर्भात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला कृषी आयुक्त धीरजकुमार, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू तसेच रोपवाटिका उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी व संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते.यावेळी बोलताना श्री दादाजी भुसे म्हणाले की, नर्सरी हब झाल्याने शेतकऱ्यांना फळे,भाजीपाला, फुले,मसाला पिके,, औषधी तसेच सुगंधी वनस्पती तसेच विविध प्रकारच्या फळांची कलमे आणि रोपे एका ठिकाणी पाहणी करून त्यांची निवड करता येणे शक्य होईल तसेच 

विशिष्ट वानाच्या खरेदी-विक्री विक्रीतील किमतीचा  फरक कमी होऊन  नफेखोरीला आळा बसून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. या नर्सरी हब मुळे लघु उद्योग चालना, रोजगार निर्मितीमध्ये वाढ तसेच शोभिवंत फुले फळे निर्यात वाढून देशाच्या परकीय चलन वाढीस मदत होईल, असे श्री भुसे यांनी म्हटले.

English Summary: present to proposal to agriculture university for establish nusury hub in maharashtra Published on: 10 February 2022, 01:14 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters