रखरखत्या उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर आता सर्वचजण पावसाची वाट बघत आहेत. मात्र जून महिना उजाडला तरी राज्यात सर्वत्र ऊनच आहे. पोषक वातावरण असल्यामुळे यंदा राज्यात वेळेत तसेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता. मात्र तसं काही घडलं नाही. उलट पाऊस लांबणीवर गेला. शेतकरी वर्गाने तर पाऊस वेळेत पडेल या आशेवर खरिपाची सर्व तयारीदेखील केली.
मात्र उशिरा का होईना पावसाला सुरुवात झाली असून राजधानीसह मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, बीड जिल्ह्यांमध्ये पावसाचे आगमान झाले आहे. आता खरिपाला पोषक असे वातावरण तयार झाले आहे. मात्र अंतिम टप्प्यात असलेल्या केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात केळी बागांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तोडणीचे दिवस जवळ आले असताना वसमत तालुक्यात करुंदा आणि गिरगाव येथे मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. परिणामी केळी बागा उध्वस्त झाल्या असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
केळी बागाचे मोठे नुकसान
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात केळी बागांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यातल्या त्यात कुरुंदा व गिरगांव मंडळात केळीचे क्षेत्र मोठे आहे. आणि त्याच क्षेत्रात पावसाने हजेरी लावली. बुधवारी अचानक झालेल्या पावसामुळे दोन्ही मंडळातील केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. सध्या निर्यातक्षम केळी काढणीची लगबग सुरु होती. केळी निर्यातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असतो. मात्र आता याचेच नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. केळीच्या नुकसानभरपाईची शेतकरी मागणी करत आहे.
शेतकऱ्यांची मागणी
दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या फळबागांचे भरून न निघणारे नुकसान केले. त्यामुळे आता सरकारने पाहणी आणि पंचनामे या प्रक्रिया न करता एकरी 2 लाखाची मदत करावी अशी मागणी गिरगांव येथील बालाजी नादरे या शेतकऱ्याने केली आहे. मागीलवर्षी झालेल्या अवकाळी पावसानेसुद्धा पिकांचे बरेच नुकसान केले शिवाय या वर्षी देखील मान्सूनपूर्व पावसामुळे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
विमा कंपन्यांचे केळी उत्पादकांकडे दुर्लक्ष
दरवर्षी पीकविम्याचा लाभ घेण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी नाव नोंदणी करत असतात. मात्र विमा कंपन्यांचे केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सहभागच नोंदवला नाही. शिवाय पीकविम्याचे निकष बदल्याने बऱ्याच केळी उत्पादकांनी विमाच भरला नाही. त्यामुळे आता सरकारने कोणतेही निकष न लावता सरसकट एकरी 2 लाखाची मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 14 खरीप पिकांसह 17 पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर
मोठी बातमी! गहू निर्यात बंदीबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय
Share your comments