केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून त्यांना आर्थिक लाभ मिळेल. यामधीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana). या योजनेत महिन्याला फक्त 1 रुपया जमा करून सरकारकडून 2 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana) ही योजना लोकांसाठी, विशेषतः गरीब लोकांसाठी महत्वाची ठरत आहे. कारण या योजनेत सामील होण्यासाठी तुम्हाला वार्षिक फक्त 12 रुपये गुंतवावे लागत आहेत. यानंतर तुम्ही 2 लाखांच्या विमा संरक्षणासाठी पात्र व्हाल.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत (PMSBY) सामील झाल्यानंतर, तुमचा गंभीर अपघात किंवा अपघातात मृत्यू झाल्यास, तुम्हाला सरकारी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
हे ही वाचा
Modern Agriculture: आधुनिक शेतीतून 'हे' गाव करतय लाखोंची कमाई; जाणून घ्या सविस्तर
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास विमाधारकाला 2 लाख रुपये देण्याची तरतूद आहे.
आवश्यक कागदपत्रे
1) अर्जदाराला त्याचं आधार कार्ड बँकेशी लिंक करावं लागेल, त्यानंतर दरवर्षी 1 जूनपूर्वी एक फॉर्म भरून बँकेला द्यावा लागेल.
या योजनेत 1 जून ते 31 मे पर्यंत एक वर्षाचे कव्हर आहे, ज्याचे दरवर्षी बँकेमार्फत नूतनीकरण करावं लागतं.
हे ही वाचा
Cultivation Of Plants: होय खरंय! फळापासून पानापर्यंत मिळणार भरघोस कमाई; करा 'या' वनस्पतीची लागवड
2) जर एखाद्याचं संयुक्त खातं असेल तर अशा परिस्थितीत सर्व खातेदार या योजनेत सामील होऊ शकतात. या योजनेत फक्त एक बँक खातं समाविष्ट केलं जाऊ शकतं. योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी, खातेदाराला ज्या बँकेत त्यांचं खातं आहे, त्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेवर लॉग इन करावं लागेल.
महत्वाच्या बातम्या
Agricultural Business: शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात शेतीच्या बांधावर लावा 'ही' झाडे; मिळेल भरघोस उत्पन्न
Insurance Policy: फक्त 20 रुपयांमध्ये मिळवा 2 लाख रुपयांपर्यंत विमा; जाणून घ्या प्रोसेस
Insecticide: शेतकरी मित्रांनो घरीच बनवा नैसर्गिक किटकनाशक; पैशांची होईल मोठी बचत
Share your comments