1. कृषीपीडिया

Cultivation Of Agriculture: शेतकरी मित्रांनो 'या' शेतीची करा लागवड; वर्षाला ८ ते १० लाखांचा होतोय नफा

शेतकरी चांगले उत्पादन काढण्यासाठी नवनवीन पिकांचा अवलंब करत असतात. मात्र शेतकऱ्यांना माहीत नसलेली अशी बरीच पिके आहेत, ज्यातून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतो. फणस शेतीतून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात.

Cultivation Of AgCultivation

Cultivation Of AgCultivation

शेतकरी (farmers) चांगले उत्पादन काढण्यासाठी नवनवीन पिकांचा अवलंब करत असतात. मात्र शेतकऱ्यांना माहीत नसलेली अशी बरीच पिके आहेत, ज्यातून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतो. फणस शेतीतून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात.

फणसाची लागवड (Cultivation of hemp) भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. फणसमध्ये लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे घटक असतात. विशेष म्हणजे हे फळ खाण्यासह त्याची भाजी देखील केली जाते. अनेक शेतकरी फणस लागवडीचा यशस्वी प्रयोग करुन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत.

हे ही वाचा 
Rain Damage Crop: काय सांगता! पावसामुळे शेतीचे होणारे नुकसान टळणार; फक्त 'या' पद्धतींचा वापर करा

आज आपण फणसाच्या लागवडीसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया..

1) फणस अर्थात जॅकफ्रूटची लागवड (Cultivation of jackfruit) सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते, परंतु वालुकामय चिकणमाती त्याच्या पिकासाठी अतिशय योग्य मानली जाते. मात्र जमीन जलमय होणार नाही याची काळजी घ्यावी.

2) तिच्या लागवडीतील जमिनीचा पीएच मूल्य सुमारे ७ असावे. जून ते सप्टेंबर महिन्यात याची लागवड करता येते. उष्ण व दमट हवामान हे फणसाच्या पिकासाठी योग्य मानले जाते.

हे ही वाचा 
Groundnut Cultivation: शेतकरी मित्रांनो भुईमुगाच्या 'या' वाणाची करा लागवड; मिळेल दुप्पट उत्पन्न

3) त्याची रोपे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सहज वाढतात, परंतु थंडीत पडणारे दंव त्याच्या पिकासाठी हानिकारक असते. यासोबतच १० अंशांपेक्षा कमी तापमान झाडांच्या वाढीसाठी हानिकारक आहे.

4) फणसाचे रोप (A hemp plant) तयार झाले की ते अनेक वर्षे उत्पादन देते. जर फणसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली तर शेतकर्‍यांना वर्षाला ८ ते १० लाख रुपयांचा नफा सहज मिळू शकतो.

महत्वाच्या बातम्या 
Gas Cylinder Subsidy: तुम्हाला गॅस सिलिंडरवर सबसिडी किती मिळते? जाणून घ्या घरबसल्या..
Horoscope: ऑगस्टमध्ये 'या' चार राशींचे भाग्य उजळणार; वाचा सविस्तर
Onion Rate: कांद्याच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या आजचा कांदा बाजारभाव...

English Summary: Cultivation Of Agriculture earn rupees 8 to 10 lakhs profit Published on: 04 August 2022, 10:51 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters