पीएम किसान योजने (pm kisan scheme) संदर्भात केंद्र सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी (E-KYC) केले नाही त्यांना आणखी एक संधी देण्यात आली आहे.
सरकारने ई-केवायसी (E-KYC) करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. यापूर्वी या प्रक्रियेची अंतिम मुदत ३१ जुलै ठेवण्यात आली होती. जर तुम्हीही अशा शेतकऱ्यांपैकी (farmers) असाल ज्यांना आतापर्यंत ई-केवायसी करता आले नाही, तर नक्कीच ही प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा.
ई-केवायसीसाठी मुदत वाढवली
आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 11 हप्ते हस्तांतरित करण्यात आले आहेत. 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो. या सगळ्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांना एक मोठी बातमी दिली आहे.
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटनुसार (website), ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केले नाही त्यांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. सरकारने (government) आता ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती.
Castor Farming: एरंडेल शेतीतून लाखोंची कमाई घेण्यासाठी 'या' खास पद्धतीचा अवलंब करा; जाणून घ्या
ई-केवायसी प्रक्रिया अशी करा
1) सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
2) येथे तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल, जिथे E-KYC टॅबवर क्लिक करा.
3) आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.
4) आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
5) सबमिट OTP वर क्लिक करा.
6) आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी केले जाईल.
Animal Husbandry: जनावरांमध्ये कॅल्शिअमची कमतरता आहे? तर वेळीच लक्षणे ओळखून करा उपचार
'या' हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा
जर तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेसाठी नोंदणी करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा नोंदणी केल्यानंतरही या योजनेचे पैसे तुमच्या खात्यात पोहोचत नसतील, तर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करू शकता.
याशिवाय 18001155266 या टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांशी संपर्क साधता येईल. त्याच वेळी, शेतकरी pmkisan-ict@gov.in वर मेल करून समस्येचे निराकरण देखील मिळवू शकतात.
महत्वाच्या बातम्या
Electric Scooters: Hero एलेक्ट्रिक स्कूटर फक्त 10 हजार रुपयात घरी घेऊन या; वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये
विनायक मेटेंच्या अपघाताबाबत खळबळजनक माहिती आली समोर! अपघाताआधी 3 ऑगस्टला...
खरीप हंगामातील पिकांवर किडींचा प्रादुर्भाव; वेळीच करा कीड व्यवस्थापन, अन्यथा होईल मोठे नुकसान
Share your comments