पीएम किसान योजना : लाभार्थींना नाही मिळणार वाढीव रक्कम; तो प्रस्तावच नाही - केंद्रीय कृषीमंत्री

17 September 2020 06:46 PM By: भरत भास्कर जाधव


पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही मोदी सरकारची लोकप्रिय झालेली योजना आहे. सध्या ही योजना घो़टळ्यामुळे अजून चर्चित आली आहे. दरम्यान पीएम किसान योजनेविषयीची अजून मोठी बातमी हाती आली आहे. या वृत्तामुळे अनेकांची धक्का बसणार आहे. ही धक्कादायक बातमी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. तोमर यांनी सांगितले आहे, की या योजनेतून देण्यात येणारी रक्कम वाढविण्यात येणार नाही. याविषयीचा कोणताच प्रस्तावच आला नसल्याचे स्पष्टीकरण तोमर यांनी मंगळवारी लोकसभेच्या सत्रात बोलत होते.

दरम्यान ऑगस्ट महिन्यापर्यंत पीएम किसान योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात ३८ हजार २८२ रुपये पाठविण्यात आली आहे. यासह तोमर म्हणाले की, या योजनेतून देण्यात येणारी रक्कम वाढविण्याचा कोणताच प्रस्ताव आलेला नाही. दरम्यान या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यात ६ हजार रुपये पाठविले जातात.  दरम्यान महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा गेला नसल्याची माहितीही तोमर यांनी दिली. याविषयीची तक्रार केंद्राकडे आल्याची पृष्टी त्यांनी दिली आहे. 

हेही वाचा : PM Kisan Samman Nidhi Yojana: लवकरच खात्यात येणार दोन हजार रुपये; पण 'ही' चुकी करा दुरुस्त

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहावा हप्ता पाठवला आहे. तर सातवा हप्ता पाठविण्याची तयारी सरकारकडून सुरू झाली आहे. देशभरातून बिहारमधील शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळाला असल्याचे माहिती खुद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.दरम्यान या योजनेचा अर्ज भरताना अनेक शेतकरी चुकी करत असतात. अर्जात नाव लिहिताना नाव चुकवत असतात. बऱ्याच वेळा आधार कार्ड आणि अर्जातील नावात बदल असतो. कधी कधी बँकेशी आधार कार्ड जोडलेले नसते. या चुकांमुळेही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा येत नाही.


PM Kisan Yojana Beneficiaries pm kisan Beneficiaries पीएम किसान योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना मोदी सरकार modi government केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर Union Agriculture Minister Narendra Singh Tomar pradhanmantri kisan samman nidhi
English Summary: PM Kisan Yojana : Beneficiaries will not get the increased amount, there is no proposal to increase the fund

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.