1. इतर बातम्या

PM Kisan Samman Nidhi Yojana: लवकरच खात्यात येणार दोन हजार रुपये; पण 'ही' चुकी करा दुरुस्त

केंद्र सरकारची लोकप्रिय असलेली पीएम किसान योजना म्हणजेच शेतकरी सन्मान निधी योजनेतून अल्प आणि छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. दरम्यान या योजनेच्या अंतर्गत सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
PM Kisan Samman Nidhi Yojana

PM Kisan Samman Nidhi Yojana

केंद्र सरकारची लोकप्रिय असलेली पीएम किसान योजना म्हणजेच शेतकरी सन्मान निधी योजनेतून अल्प आणि छोट्या शेतकऱ्यांना  आर्थिक मदत केली जाते. दरम्यान या योजनेच्या अंतर्गत सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आता सरकार सातव्या हप्ता पाठविण्याची तयारी करत आहे.  लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता येणार आहे.

दरम्यान केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे लक्षात घेत सरकारने कोरोना व्हायरसच्या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली.  पीएम किसान योजना ही  मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. देशभरात कोट्यवधी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.  दरम्यान या योजनेचा सर्वाधिक लाभ बिहार राज्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे.  या योजनेचा पुढचा म्हणजे सातवा हप्ता हा नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत ट्रान्सफर केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लॉन्च केला. यावेळे बोलताना मोदी म्हणाले की,  पीएम किसान योजनेच्या अंतर्गत देशभरात १० कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.  शेतकऱ्यांना या योजनेचा पैसा थेट त्यांच्या खात्यात टाकला जातो. बिहार राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या अधिक लाभ मिळाला असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विटर वरुन दिली.

हेही वाचा:SBI ची ऑफर : व्हॉट्सअप मेसेजनंतर एटीएम येईल आपल्या दाराशी

दरम्यान अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याचे एक कारण आहे ते म्हणजे अर्ज भरताना चुकीची माहिती दिल्याने. बऱ्याच वेळेस आधार क्रमांक चुकीचा टाकला जातो. अनेक जणांनी आधार क्रमांक आपल्या बँकेशी संलग्न केलेला नाही. आधारवरील नाव आणि अर्जावरील नाव वेगळे असल्याने अनेकांचे अर्ज रद्द केले जातात आणि लाभार्थींमध्ये शेतकऱ्यांची नावे येत नाहीत. जर आपल्याला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळाला नसेल तर आपल्या आधार कार्ड किंवा बँक अकाउंट आणि इतर कागदावर नावाची स्पेलिंगमध्ये  चुकी असेल. नावात चुकी असल्यामुळे बहुतेक लोकांच्या खात्यात पैसे आले नाहीत.

जर असे काही असेल त्या चुका दुरुस्त करा. ह्या चुका आपण घरी बसूनही दुरुस्त करु शकता. PM-Kisan Scheme च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://pmkisan.gov.in/) जा. यात फार्मर कॉनरच्या आत जाऊन Edit Aadhaar Detail या पर्यायावर क्लिक करा.  येथे आपला आधार नंबर टाका.  यानंतर एक कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. जर आपले नाव चुकी आहेचा म्हणजेच अर्जावरीत आणि आधारवर आपले नाव वेगवेगळे आहे. ते हे आपण ऑनलाईनने घरी बसून निट करू शकतो. जर अजून दुसरी चुकी असेल तर आपण कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क करावा.

English Summary: PM Kisan Samman Nidhi Yojana: Two thousand rupees will come in the account soon, but correct the mistake Published on: 13 September 2020, 03:54 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters