तुरीच्या दराने यंदा चांगलाच भाव खाल्ला आहे. सोयाबीन व चण्याचे दर मात्र घसरणीला लागले आहेत. दोन्ही पिकांचे दर आता वधारण्याची शक्यता मावळली असल्याचे जाणकारांचे मत आहे. चालू हंगामात तुरीच्या दरांमध्ये सुरुवातीपासूनच तेजी राहिली आहे. देशांतर्गत घटलेले उत्पादन, मर्यादित आयात आणि चांगला उठाव यामुळे तुरीला चढे दर मिळाले आहेत.
तुरीच्या दराने काल अमरावती बाजार समितीत १० हजारांचा टप्पा गाठला, तर अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत केवळ २६ क्विंटल तुरीला ११६५ रुपयांचा दर मिळाला. चालू हंगामातील तूर बाजारात आली तेव्हा दर तेजीत होते. नवी तूर हाती येण्याच्या आधीच यंदा देशातील उत्पादन कमी असल्याचे स्पष्ट झाले होते.
गेल्या हंगामात तुरीला कमी भाव मिळाला होता. त्यामुळे गत हंगामात पेरणी क्षेत्र कमी झाले. गेल्या हंगामात तुरीला ६६०० रुपये हमीदर जाहीर झाला. या हंगामातील नवीन तूर बाजारात येण्याच्या दोन महिन्यांपूर्वीच तुरीने हमीभावाचा टप्पा ओलांडला. तुरीची आवक वाढल्यानंतरही भाव कमी झाले नाहीत. आणखी काही काळ तुरीचे दर तेजीतच राहतील.
राज्यात 10 जूनपर्यंत पावसाला सुरुवात होणार, शेतकऱ्यांची लगबग सुरू..
बुअमरावती बाजार समितीत १०२५, तर वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत अवघ्या एक क्विंटल तुरीला ११ हजार रुपये तर अकोला बाजार समितीत २५ क्विंटलला ११ हजार ६५ रुपयांचा दर मिळाला. सोयाबीन, चण्याचे दर घसरले या हंगामात सोयाबीन व चण्याचे दर प्रारंभीपासूनच दबावात राहिले आहेत.
सोयाबीनला सुरूवातीला साडेपाच ते सहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी आवक रोखून धरली खरी मात्र भाव चढले नाहीत. उलट त्यामध्ये सातत्याने घसरणच दिसून येऊ लागली आहे. सध्या स्थानिक बाजारात सोयाबीनला ४७५० ते ४८८१ रुपये दर आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
शेतकरी पिकांवर फवारत आहेत दारु, कारण ऐकून वाटेल आश्चर्य..
राज्यात 10 जूनपर्यंत पावसाला सुरुवात होणार, शेतकऱ्यांची लगबग सुरू..
LPG गॅसच्या दरांत मोठी घट, सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त
Share your comments