1. बातम्या

LPG गॅसच्या दरांत मोठी घट, सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त

सध्या एलपीजी गॅसच्या किमतींत (LPG Gas Cylinder Price) मोठी घट झाली आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एलपीजी (LPG) विकणाऱ्या कंपन्यांनी दर स्वस्त केले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीतही (Commercial LPG Cylinder) कपात झाली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Huge reduction in LPG gas prices (image google)

Huge reduction in LPG gas prices (image google)

सध्या एलपीजी गॅसच्या किमतींत (LPG Gas Cylinder Price) मोठी घट झाली आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एलपीजी (LPG) विकणाऱ्या कंपन्यांनी दर स्वस्त केले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीतही (Commercial LPG Cylinder) कपात झाली आहे.

असे असले तरी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर (Cylinder Price) पूर्वीप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. दरम्यान, आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत.

पूर्वी हाच सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळत होता. यामुळे यामध्ये काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी झाली असून ती आता 1773 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे.

शेतकऱ्यांनो कापूस वाणाची निवड करताना घ्या योग्य काळजी

सध्या मुंबईत 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर 1725 रुपयांना विकला जात आहे, तर चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1973 रुपये आहे. जेट इंधनाच्या (एअर फ्युएल) किमतीतही तेल कंपन्यांनी कपात केली आहे. किंमतीत सुमारे 6,600 रुपयांची घट झाली आहे. याचा परिणाम आगामी काळात विमान प्रवासावर होऊ शकतो.

राज्यात 10 जूनपर्यंत पावसाला सुरुवात होणार, शेतकऱ्यांची लगबग सुरू..

गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसचा दर 1856.50 रुपये प्रति सिलेंडर होता. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. 1 जूनपासून, बदललेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये 1773 रुपयांना विकला जात आहे. आणि 1 जून रोजी कोलकातामध्ये 1875.50 रुपयांना मिळत आहे.

महिंद्राचा हा ट्रॅक्टर सर्वात शक्तिशाली! आधुनिक आणि प्रगत सुविधांनी सुसज्ज
राज्यात 10 जूनपर्यंत पावसाला सुरुवात होणार, शेतकऱ्यांची लगबग सुरू..
अंड्यांचे दर वाढणार? श्रीलंका भारताकडून रोज दहा लाख अंडी आयात करणार

English Summary: Huge reduction in LPG gas prices, cylinder cheaper by Rs 83.5 Published on: 01 June 2023, 09:07 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters