गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल - डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे अनेकांनी इलेक्ट्रिक गाडीचा पर्याय निवडला आहे. असे असताना आता याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काल पेट्रोल- डिझेल स्वस्त करण्याची मोठी घोषणा केंद्र सरकरने केली. मोदी सरकार(Modi government) ने २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल पेट्रोल मध्ये मिश्रण करू असे सांगितले होते.
आता मात्र २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. याबाबत मोदी सरकारने तारीख जाहीर केली आहे. १ एप्रिल २०२३ पासून इथेनॉल २० टक्के मिश्रित पेट्रोल उपलब्ध होणार त्यामुळे थेट पेट्रोल - डिझेल च्या दरात मोठी कपात होईल असे सांगण्यात आले आहे. यामुळे अजून थोडे दिवस याबाबत प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे असले तरी आता किती रुपयांनी याचे दर कमी होणार याकडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे.
सध्या तेलाची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. आता सध्या पेट्रेलमध्ये ८ टक्के इथेनॉल मिक्स करण्याऐवजी २० टक्के करण्यात येणार आहे. यामुळे याचा भार काहीसा कमी होणार आहे, यामुळे याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. पेट्रोलमध्ये जर इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आला तर शेतकऱ्यांचा मोठा फायदा (Big advantage) होणार आहे.
यामुळे शेतकरी यासाठी आग्रही आहेत, यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळणार आहे. इथेनॉल हे एक प्रकारे अल्कोहोल असते. यामुळे १ एप्रिल २०२३ पासून इथेनॉल २० टक्के मिश्रित पेट्रोल उपलब्ध होणार त्यामुळे थेट पेट्रोल - डिझेल च्या दरात मोठी कपात होईल असे सांगण्यात आले आहे. यामुळे आता याची सर्वजण प्रतीक्षा करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
अतिरिक्त ऊस उत्पादकाने उघड्यावर मांडला संसार, 20 महिन्याचा ऊस झाला तरीही तोड नाहीच
आता निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढणार! मोदी सरकारने केली तयारी
13 शेतकऱ्यांची क्रांती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंजिर खाणार भाव, शेतकरी होणार लखपती...
Share your comments