
one mango is being sold for 21 thousand
सध्या अनेक शेतकरी आपल्या शेतात अनेक वेगवेगळे प्रयोग करतात. यामधून ते लाखो रुपये देखील कमवतात. सध्या आंब्याचा सिझन सुरु आहे. यामुळे सगळे आपला आवडीचा फळांचा राजा म्हणजेच आंबा खाण्यात मग्न आहेत. सध्या आंब्याच्या किमती देखील आवाक्यात आल्या आहेत. असे असताना एक आंब्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याची किंमत बघून तुम्ही देखील चक्रावून जाल.
बिहारमधील पुनिया आणि मध्य प्रदेशातील जबलपूर येथेही हा आंबा आढळतो. हा आंबा भारतात मिळत असला, तरी सामान्य माणूस हा आंबा विकत घेऊ शकता नाही, कारण म्हणजे तो खूपच महाग आहे. त्याच्या किंमतीत एक दुचाकी वाहन नक्की येईल. या आंब्याची किंमत 2.7 लाख रुपये प्रति किलो आहे. यामुळे तो सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही.
या महागड्या आंब्याचे नाव 'तैयो नो तामांगो' आहे. हे जपानमधील मियाझाकी येथे आढळतो, सध्या मध्य प्रदेशातील जबलपूरमध्येही त्याची काही झाडे आहेत आणि एक झाड बिहारमधील पूर्णियामध्ये आहे. या आंब्याची भारतातील किंमत 21 हजार आहे. हा आंबा चवीला गोड तसेच नारळा सारखा लागतो, एवढेच काय तर या आंब्याला अननसाची चवही आहे. यामुळे तो इतर आंब्यांपेक्षा वेगळा आहे.
हा आंबा बराच काळ उष्ण वातावरण, सूर्यप्रकाश आणि पाऊस पडल्यानंतर पिकतो. यामुळे त्याची खूपच निगा राखावी लागले. जपानमध्ये तैयो नो तामांगो आंब्याची लागवड ७० आणि ८० च्या दशकात सुरू झाली. भारतात मोठ्या आंबा उत्पादक शेतकरी आहेत. मात्र असे महागडे आंबे जास्त नाहीत, यामुळे त्याची खरेदी देखील मोठी लोक करतात.
महत्वाचा बातम्या;
पुण्यात रंगणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत, दीड कोटींचे बक्षीस...
शेळीपालन अॅप: 'हे' मोबाइल अॅप शेळीपालनाबद्दल देतात चांगली माहिती, मिळेल दुप्पट नफा
शेतकऱ्यांनो डाळीतले किडे काढण्याची सोपी ट्रिक वापरा, एका मिनिटात होईल काम
Share your comments