1. फलोत्पादन

जाणून घ्या फळबागांवर पडणारा थंडीचा परिणाम आणि उपाय योजना

precaution in winter season

precaution in winter season

 कोणत्याही वनस्पतीच्या वाढीवर हवामानाचा कमी-जास्त प्रमाणात परिणाम होत असतो. फळबाग पिकांमध्ये तापमान बदलाचा निश्चित परिणाम होतो. हिवाळ्यामध्ये दहा अंश सेंटिग्रेड तापमान कमी झाले तर त्याचा पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी हिवाळ्यात फळबागांची विशेष काळजी घ्यायला हवी. कमी तापमानामुळे झाडाची वाढ मंदावते, जमिनीचे तापमान कमी होते तसेच वनस्पतींच्या पेशीमरतात. फळबागांमध्ये फळे तडकतात यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, केळी, डाळिंब, पपई इत्यादी फळपिकांचा समावेश असतो.अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही. केळी पिकामध्ये घड बाहेर पास्त नाही. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

 उष्ण हवामानात वाढणाऱ्या फळझाडांच्या मोहराला शितल लहरी मुळे जास्त नुकसान पोहोचत आंब्याचा मोहोर जळतो. सदाहरित झाडे ही पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा लवकर आणि जास्त प्रमाणात नाजूक असून थंडीच्या दुष्परिणामस बळी पडतात.तापमान दोन अंश सेंटिग्रेड च्या खाली गेल्यास पपईची वाढ थांबते. फळांची प्रत बिघडते तसेच जास्त थंडीमुळे झाडे मरतात. केळीच्या बाबतीत तापमान चार ते पाच अंश सेंटिग्रेड च्या खाली गेले तर झाडाची वाढ मंदावते. पाने पिवळी पडतात व केळफूल बाहेर पडत नाही.फळांना चिरा पडतात. द्राक्ष बागेमध्ये द्राक्ष वेलीच्या वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या काळात कडक थंडीचा वाईट परिणाम होतो. द्राक्षाची फळे गळतात.फळांची प्रत खराब होते तसेच द्राक्षाची कोवळी फूट, पानेआणि मनी यांची नासाडी होते. तसेच वेली मरतात. यापासून बचाव करण्यासाठी काय करावे याबद्दल माहिती घेऊ.

 पूर्व दक्षतेचे उपाय

 • थंडीउष्णतामानआणिवारायांच्यापासून संरक्षण करण्याकरिता वाराच्या बाजूने वारा प्रतिबंध झाडांची उदा. सुरू, बांबू,घायपात,मलबेरी, शेवगा, शेवरी, खडसरणी इत्यादी झाडांच्या रांगा लावाव्यात.
 • बागेच्या सभोवताल मध्यम उंच कुंपण घालून झाडांची लागवड करावी. उदा.शेवरी, मेदी, चिलार, कोयनेल, घातपात इत्यादी झाडांची सतत निगावछाटणीकरावी.
 • रब्बी हंगामात मुख्य फळझाडे लहान असल्यास दोन झाडातील मोकळ्या जागेत, उघड्या जमिनीवर दाट पसरणारी आंतरपिके घ्यावीत. उदा. हरभरा,वाटाणा,घेवडा, पानकोबी, फुलकोबी, मठ इत्यादी.
 • केळी, पपई व पानवेली च्या भोवती दाट शेवरी लावावी.
 • केळीची लागवड, केळफुल कडक थंडीत बाहेर पडणार नाही याची दक्षता घेऊनच करावी.

प्रत्यक्ष नियंत्रणाचे उपाय

हवामान विभागाची जर कडक थंडी किंवा थंडीची लाट येणार याची सूचना मिळाल्यास खालील उपाययोजना करावी.

 • फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्यावेळी मध्यम ओलसर पालापाचोळा पेटवून धूर करावा. त्यात दगडी कोळसा, रबरी जुन्या वस्तू, टायर,ओली लाकडे त्यात टाकून धूर व उष्णता रात्रभर मिळेल असे पाहावे किंवा खराब होईल जाळून दूर करून वलय करावे.
 • बागेसरात्री पाणी द्यावे त्यामुळे जमिनीचे तापमान वाढते व पर्यायाने बागेतील तापमान वाढीस मदत होते.
 • थंडीची लाट येणार हे लक्षात येताच सायंकाळी फळझाडांना विहिरीचा हलके पाणी द्यावे. विहिरीच्या पाण्याचे तापमान कालव्याच्या पाण्यापेक्षा थोडे जास्त असते. अशी ओली जमीन लवकर थंड होत नाही.
 • झाडांच्या खोडा जवळ व आळ्यात गवत, कडबा, पाचोळा व गव्हाचे तुसइत्यादीचे आवरण घालावे.
 • केळीच्या बागेस रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे व 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड द्यावे. केळीच्या घडाभोवती व खोडाभोवती त्याच झाडांची पाने गुंडाळावित.
 • द्राक्ष बागे सभोवती गोणपाट किंवा इतर कापडाचे पडदे लावावेत. याचा उपयोग बागेत थंड हवेची लाट अडवली जाते.
 • डाळिंबाची फळे तडकू नयेत म्हणून नियमित पाणी द्यावे. बागेचे थंडीपासून संरक्षण तसेच 0.2 टक्के बोरॅक्‍स ची फवारणी करावी.
 • रोपवाटिकेतील रोपे, कलमे, रोपांची वाफे यावर रात्री आच्छादन घालावे व सकाळी ते काढावे. त्यासाठी तुराटी, कडबा यांचे तट्टे, काळे प्लास्टिक,पोती यांचा उपयोग करावा.
 • पालाशयुक्त वर खत किंवा राख खत म्हणून दिल्यास झाडांची जलवा अन्नद्रव्ये शोषणाची आणि वहनाची क्षमता वाढून पेशींचा काटक पणा वाढतो. अशाप्रकारे फळझाडांचे खडक थंडीपासून संरक्षण करून संभाव्य नुकसान टाळावे.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters