1. बातम्या

शेतकऱ्यांनी केली एकी आणि त्यांचे दिवसच बदलेले; कांद्याच्या भावात अशी काही वाढ झाली की...

शेतकरी बांधवांसाठी शेती हेच जगण्याचे साधन आहे. मात्र सध्याच्या घडीला कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कित्येक कांदा उत्पादकांनी कांदा फुकटात वाटून टाकला तर कोणी जाळून टाकला.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
उत्पादन बंद करण्याचा सामूहिक निर्णय

उत्पादन बंद करण्याचा सामूहिक निर्णय

शेतकरी बांधवांसाठी शेती हेच जगण्याचे साधन आहे. मात्र सध्याच्या घडीला कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कित्येक कांदा उत्पादकांनी कांदा फुकटात वाटून टाकला तर कोणी जाळून टाकला. काही शेतकरी तर जनावरांना कांदा खाऊ घालत आहेत. कांद्याचे दर घसरल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले.

मात्र या सगळ्या अडचणीतून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग पण आता शेतकऱ्यांनी शोधून काढला आहे. कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचा खर्च देखील वसूल होत नाही. दिवसेंदिवस कांद्याचा भाव इतका कमी होत आहे की, शेतमाल बाजारात नेण्याचा खर्चसुद्धा यातून निघत नाही. मात्र आता शेतकऱ्यांनी या परिस्थितीशी दोन हात करण्याचे ठरवले आहे. भारत देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जाते. त्यामुळे कांद्याचे भाव घसरल्याने याचा सगळ्यात मोठा फटका हा येथील शेतकरी बंधूना बसला आहे.


यावर तोडगा म्हणून शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करण्याचा एकंदरीत उत्पादन बंद करण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे. आणि या कृतीला प्रत्येक्ष सुरुवात देखील झाली आहे. यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाला आहे. केवळ आठवडाभरातच कांद्याला दुप्पट भाव मिळत आहे. गेले काही दिवस कांद्याला कवडीमोल भाव मिळत होता. शेतकऱ्यांकडून दोन ते तीन रुपये किलो दराने कांद्याची खरेदी केली जात होती. मात्र शेतकऱ्यांनी उत्पादन बंद केल्यामुळे आता याच कांद्याचा घाऊक भाव हा 17 रुपयांपर्यंत पोहचला आहे.

मोठी घोषणा: केजरीवाल सरकार कृषी क्षेत्राला देणार चालना; जाणून घ्या प्रकल्प

सततचे नुकसान होण्याऐवजी शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करण्याचा किंवा उत्पादन बंद करण्याचा सामूहिक निर्णय घेतला. त्याचा परिणामही आता दिसू लागला आहे. शेतकऱ्यांना आठवडाभरात दुप्पट भाव मिळत आहे. आठवडाभरापूर्वी कांद्याचा घाऊक भाव सात ते आठ रुपये किलो होता. त्याचवेळी शेतकऱ्यांकडून दोन आणि तीन रुपये किलो दराने खरेदी केली जात होती. मात्र उत्पादन थांबवल्यानंतर परिस्थिती सुधारली असून काही ठिकाणी घाऊक भाव 17 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

किमती वाढल्यास सरकारने हस्तक्षेप करू नये
सध्या नागपूरमध्ये कांद्याचा भाव 12 ते 15 रुपये किलोवर गेला असून काही वाणांचा भाव 17 रुपये किलो असा आहे. त्यामुळे आता दर वाढल्यामुळे सरकरने हस्तक्षेप न करण्याची अपेक्षा शेतकरी संघटनांकडून व्यक्त केली आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी टाईम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले की, सरकार दर वाढले की निर्यातीवर बंदी घालते. याआधी असे कितीतरी निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने यावर कोणताच निर्णय घेऊ नये कारण दर घसरल्याने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होते. आता शेतकऱ्यांना नफा कमावण्याची संधी मिळावी, अशी इच्छा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी व्यक्त केली आहे.

नागपुरात कांद्याचा सरासरी भाव 12 ते 15 रुपये किलोवर गेला आहे. त्याचबरोबर काही वाणांचा भाव 17 रुपये किलोपर्यंत मिळत आहे. आता दर वाढू लागल्याने सरकार हस्तक्षेप करू नये, अशी अपेक्षा शेतकरी संघटनांकडून व्यक्त होत आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले की, याआधी असे दिसून आले आहे की, दर वाढले की सरकार निर्यातीवर बंदी घालते. आगामी काळात भाव वाढल्यास सरकारने असा कोणताही निर्णय घेऊ नये, अशी आमची इच्छा आहे. दर घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल, तर भाव वाढल्यास नफा कमावण्याची संधी मिळावी, असे ते म्हणाले.

या उपायानंतर आम्हाला फायदा होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी उत्पादन बंद केले नसते तर नुकसानीला सामोरे जावे लागले असते. किलोमागे 20 ते 25 रुपये दर मिळाला तर फायदा होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एक एकरात कांदा लागवडीसाठी साधारण 60 ते 65 हजार रुपये खर्च येतो. मात्र या उत्पादनातून त्यांना योग्य भाव मिळाला तर त्यातून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याला किमान किंमत निश्चित करून एमएसपीसारखी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:
राष्ट्रपती पदासाठी पाच नावे चर्चेत, बड्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
बातमी कामाची: राज्य सरकारने घेतला कृषीबाबत मोठा निर्णय; आता कृषी मालाला मिळेल योग्य भाव

English Summary: Onions were fetching exorbitant prices; Onion prices rose due to farmers' unification Published on: 10 June 2022, 12:01 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters