गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या कांद्याचे दर खूपच पडले आहेत. यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नाही. अनेक ठिकाणी कांदा एका रुपया किलोने विकला जात आहे. यामुळे वाहतूक खर्च देखील निघत नाही. त्यामुळे सरकारच्या धोरणाचा निषेध करीत चांदुर बाजार तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण बांधून सरकारने कांदा दराच्या धोरणात बदल करण्याची मागणी केली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे.
याबाबत मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय कार्यालयाला कांद्याचे धोरण बांधून कांदा दराबाबतच्या धोरणात काय बदल होईल का हे येणाऱ्या काळातच समजणार आहे. खरिपात शेतकऱ्यांकडे कांदा नसताना 60 ते 70 रुपये किलो असा दर मिळाला होता. याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला होता. मात्र नंतर हे दर पडत गेले, यामुळे ते अजून वरतीच आले नाहीत.
लाल कांद्याची आवक घटताच सुरु झालेली दरातील घसरण अजूनही कायम आहे. दरात मोठी तफावत राहत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे उत्पादनावरील खर्च हा वाढलेला आहे. दराच्या लहरीपणामुळे कांदा क्षेत्र देखील घटते काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या पिकातून उत्पन्न तर सोडूनच द्या पण चार महिने केलेला खर्चही निघत नाही. यामुळे सध्या शेतकरी अडचणीत आला आहे.
'भीक मागून कृषिमंत्र्यांना पैसे देऊ पण कांद्याला रास्तच भाव घेऊ'
अवकाळी व हवामान बदलामुळे कांदा पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागल्याने त्यांचा उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला. तसेच मजुरांची टंचाई तसेच मजुरीचे वाढते दर यामुळे त्यात आणखीनच भर पडली. उत्पादन खर्च आणि बाजारभाव यामध्ये कुठेही मेळ बसत नाही, यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या;
काय सांगता! खरिपाच्या तोंडावर खतांच्या पोत्याला फुलांचा हार, वाचा नेमकं काय आहे कारण..
दोन वर्षानंतर टोमॅटोने मालामाल केल्याने शेतकऱ्याने टोमॅटोच्या रोपाची काढली मिरवणूक
पेट्रोल, डिझेल होणार २० रुपयांनी स्वस्त, मोदी सरकारकडून दिलासा मिळणार
Share your comments