1. कृषीपीडिया

हे घटक करतात कांदा साठवणुकीवर परिणाम, जाणून घेऊ त्याबद्दल

onion storage

onion storage

कांदा हे पीक जास्त काळ साठवता येत नाही. आपण कांदा साठवण ही चाळीत करीत असतो.परंतु या चाळीसाठी जागेची निवड हे फार महत्त्वाचे असते. तसेच कांद्याची साठवणूक करताना कांद्या मधील पाण्याचे उत्सर्जन होत असल्याने त्याच्या वजनात घट येते.अशा बर्‍याच कारणांमुळेकांदा साठवताना बर्‍याच प्रकारच्या अडचणी येतात व नुकसान होते. कांदा साठवणुकीवर विविध प्रकारचे घटक परिणाम करीत असतात. याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 

 कांदा साठवणुवर परिणाम करणारे घटक

 • जातींची निवड:
  • कांद्याच्या सगळ्याच प्रकारच्या जाती या साठवण करताना सारख्या प्रमाणात टिकत नाहीत. जर आपण खरीप हंगामाच्या कांद्याचा विचार केला तर हा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकू शकत नाही.
  • त्या तुलनेने रब्बी हंगामात तयार होणारा कांदा चार ते पाच महिने टिकतो. परंतु त्यांच्यातही वेगळ्या जातीनुसार फरक पडतो.
  • ॲग्री फाउंड लाईट रेड किंवा अर्का निकेतन या जाती पाच ते सहा महिने वजनात विशेष घटन होता चांगले टिकतात.
 • खत आणि पाणीनियोजन:
  • आपण कांदा पिकाला खतांच्या किती मात्रा देतो आणि कोणत्या प्रकारचे खत देतो यावर देखील कांदा साठवणूक अवलंबून असते. जर कांदा पिकासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला असेल तर साठवणक्षमता वाढते. त्यासाठी जास्तीत जास्त शेणखताचा वापर करणे गरजेचे आहे.
  • कांदा पिकाला नत्राचा पुरवठा करताना योग्य काळजी घ्यावी.सर्व नत्राच्या मात्रा लागवडीनंतर 60 दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. जर नत्राचा पुरवठा उशिरा केला तर कांदा माने मध्ये जाड होऊन तोजास्त काळ टिकत नाही. तसेच पालाशच्या योग्य वापराने साठवण क्षमता वाढते.
  • कांदा पिकाला पाण्याचे नियोजन करताना ते कमी प्रमाणात द्यावे परंतु नियमित द्यावे लागते. कांदा पोचण्याच्या स्थितीत असताना जास्त पाणी देऊ नये त्यामुळे जोडकांद्याचेप्रमाण वाढू शकते.
 • काढणीनंतर कांदा सुकवण्याची प्रक्रिया:
  • कांदाचे काढणी करताना कांदा शेतातच पातीसहसुकू द्यावा. कमीत कमी कांदा असे पाच चार दिवस वाळू देणे फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर चार सेंटीमीटर लांब मान ठेवून पात कापावी.
  • काढणी केलेल्या कांद्या मधून  चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेली कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा पंधरा दिवस वाळू द्यावा. त्यामुळे कांदे चांगले टिकतात.
 • कांद्याचे आकारमान:

कांद्याचा आकारमानाचा परिणाम देखील कांद्याच्या साठवणुकीवर होत असतो. 55 ते 75 मी जाडीचे कांदे साठवणुकीसाठी चांगले असतात. जर लहान गोल्टी कांदा असेल तर तो साठवणूक करताना लवकर सडतो.

कांद्याचा आकारमान थोडा मोठा असेल तर दोन कांद्यामध्ये मोकळी जागा राहून हवा खेळती राहते व सड कमी होते.

 • साठवलेल्या कांद्याचे थरांची उंची व रुंदी:

कांदा चाळ येथील कांद्याची उंची ही चार ते पाच फुटांपेक्षा जास्त असू नये. जास्त उंची असली तर अगदी तळाशी असलेल्या खांद्यांवर वजन पडूनसड होऊ शकते. तसेच आळीची रुंदी देखील चार ते साडेचार फुटांपेक्षा जास्त असू नये.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters