
onion prices different district
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर पडलेले असताना आता कांद्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
असे असताना नाफेडकडून कांदा कमी दराने खरेदी केला जात आहे. तसेच कांदा खरेदीसाठी जिल्हानिहाय वेगवेगळे दर दिले जात आहे. यामुळे अशी तफावत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आक्रमक झाले आहेत.
यामुळे त्यांनी कांदा खरेदीबीबत नाफेडच्या पिंपळगाव बसवंत युनिटचे प्रमुख शेलेंद्र कुमार यांना पत्र लिहिले आहे. यामुळे आता या पत्रात कांद्याचे दर ठरवण्याचे कामही नाफेडच करते. परंतु नाफेडकडून कांदा खरेदीसाठी दिले जाणारे प्रतिक्विंटलचे दर जिल्हानिहाय वेगवेगळे असतात. यामुळे एकाच वेळी राज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे व खूप मोठी तफावत असलेले दर पहायला मिळत आहेत. ही गोष्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे.
यामुळे नाफेडमार्फत कांदा खरेदी करताना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकसमान दर मिळावा यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती कोल्हे यांनी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे दर ही गोष्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचे कोल्हेंनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या कांदा खरेदीबाबत अतिशय गोपनीयता पाळली जात असून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरु असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे शेतकरी नाराज आहेत.
'माझं काम ठोकायचं, गद्दारांना सोडणार नाही'
तसेच नाफेडमार्फत सुरु असलेल्या कांदा खरदीची चौकशी करुन दोषी संस्था व अधिकार्यांवर तातडीने कारवाई करावी. तसेच योग्य प्रकारे कांदा खरेदी सुरु ठेवावी, अशी मागणी देखील काही शेतकरी संघटनांकडून होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही कांद्याचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. कांद्याचे दर सावरण्यासाठी शासनाने, मुल्य स्थिरिकरण निधी अंतर्गत काही जिल्ह्यांमध्ये कांदा खरेदी सुरु केली आहे.
चिखलातून वाट, दुचाकी ट्रकमधून प्रवास, लंघुशंकेचं कारण देत शिवसेना आमदार आले पळून...
असे असताना मात्र प्रत्येक जिल्ह्यात खरेदीचे दर वेगवेगळे आहेत. यामुळे आता शेतकरी संभ्रमात आहेत. अनेकदा यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात यामध्ये बदल झाला तर शेतकऱ्यांना चार पैसे जास्तीचे मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या;
"पेरणीसाठी कर्ज द्या, नाहीतर सावकाराकडे शेती गहाण ठेवावी लागेल"
आता 'एक देश एक रेशन कार्ड', तुमच्या फायद्यासाठी देशभरात नवी योजना लागू
कारल्यातून लाखोंची कमाई! उत्पादनाबरोबरच वाढीव दराने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस
Share your comments