महाराष्ट्र राज्य भाजी व फलोत्पादन निर्यातीत देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान आहे. शेतीला अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांना आम्ही अन्नदाता संबोधतो. ज्याप्रमाणे कर्नाटक राज्यात 'ई-पिक पाहणी' कार्यरत आहे त्याप्रमाणेच राज्यातदेखील हे ॲप कार्यरत असून,याचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
कर्नाटकचे कृषिमंत्री बी.सी. पाटील यांच्या समवेत शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादाजी भुसे यांची सह्याद्री अतिथिगृहात काल (२६ मे) भेट घेतली. या भेटीदरम्यान कृषी विषयक अनेक चर्चा झाल्या. दोन्ही राज्यांतील कृषी विषयक योजना, योजनेमार्फत देण्यात येणाऱ्या सवलती, अधिकाधिक उत्पादन वाढविणे, तसेच कृषी उत्पादकांना बाजाराची उपलबद्धता याबाबत सविस्तर चर्चा केली.
राज्याच्या कृषी धोरणांबाबत माहिती जाणून घेऊन कर्नाटकचे कृषिमंत्री बी.सी. पाटील यांनी आनंद व्यक्त केला. शिवाय महाराष्ट्र राज्याप्रमाणे कृषी विषयक योजना राबविणार असे मतदेखील व्यक्त केले. यासोबतच त्यांनी कर्नाटक राज्यातील विविध योजनांची यावेळी माहिती दिली. या भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्यातील कृषीविषयक योजनांची देखील माहिती देण्यात आली.
"कर्नाटक राज्यात 'माय क्रॉप माय राईट' अंतर्गत शेतीचे मोजमाप केले जाते. शिवाय 'ई-पीक पहाणी' ॲपच्या साहाय्याने ७/१२ चे मोजमाप शेतकऱ्यांमार्फत प्रायोगिक तत्वावर करण्यात येत आहे. लवकरच यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधू नावनोंदणी करतील अशी आशा आहे. कृषी क्षेत्रात आत्महत्येचे प्रमाण वाढण्याचे सत्र सुरु आहे. मात्र शेती व्यवसायातील प्रगतीबरोबरच शेतक-यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शासन स्तरावर करत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी बंधूना दिलेल्या वचनाला पूर्ण करत 'महात्मा जोतिबा फुले पिक कर्जमाफी' योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ दिला".
राज्याची कृषी विषयक माहिती देताना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आपले मत व्यक्त केले. "ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी म्हणून ५० हजार रूपये शासन अदा करणार आहे.
कृषी क्षेत्रासह शेतकऱ्यांची प्रगती करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मानस आहे. यासाठी सर्व विभाग तसेच राज्यांमधील नवीन तंत्रज्ञान, योजनांची देवाणघेवाण केली तर हे शक्य असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी राज्याची कृषी क्षेत्रातील महत्त्वाची उत्पादने, शेतकरी महिलांसाठी योजना, कृषी क्षेत्र, राज्याचे महत्वाचे व नाविण्यपूर्ण उपक्रम, शेतकरी सन्मान योजना,
काय सांगता! चक्क मेंढ्याला झाला 3 वर्षांचा तुरुंगवास; कारण ऐकून बसेल धक्का
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, विकेल ते पिकेल, कापूस व सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी विशेष कृती योजना, पिक किटक रोग सर्वेक्षण आणि सल्लागार प्रकल्प, शेतक-यांसाठी क्षेत्रावर शाळा, फलोत्पादन लागवड, राष्ट्रीय कृषी विकास योजना, सिंचन योजना,अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना,मागेल त्याला शेततळे, पुण्यश्लोक गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,
प्रधानमंत्री फसल बिमा योजना, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना,डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, अशा आतापर्यंत राबविलेल्या योजनांची प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी माहिती दिली. तसेच कृषी आयुक्त धिरज कुमार यांनी, राज्यातील कृषी क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे सादरीकरण केले. बांबू संदर्भातील प्रकल्प उत्पादन बाजारपेठ व उपयोगीकता
यासंदर्भात राष्ट्रीय बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास यांनी सादरीकरण केले. या भेटीसाठी फलोत्पादनाचे संचालक मोते, निविष्ठा व गुणनियंत्रक संचालक दिलीप झेंडे, कर्नाटक राज्याचे आयुक्त पाणलोट विकासचे एम व्ही व्यंकटेश, कृषीच्या संचालक नंदिनी कुमार, व्यवस्थापकीय संचालक बी. एच. बानथांड, जी. टी. पुत्रा अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
हवामान बातमी:48 तासानंतर श्रीलंकेच्या वेशीवर अडकलेला मान्सून सरकणार पुढे, महाराष्ट्रातील 'या' भागात पुढील 4 दिवस पाऊस पडणार
दह्यात तुम्ही साखर टाकत असाल तर थांबा; गूळ टाकल्यास होतील आश्चर्यकारक फायदे
Share your comments