1. बातम्या

आता नेते पुन्हा शेतकऱ्यांच्या पाया पडणार; आली आणखी एक निवडणूक

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर आणखी एक रणधुमाळी पुणे जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे जिल्हा

KJ Maharashtra
KJ Maharashtra
katraj_building

katraj_building

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर आणखी एक रणधुमाळी पुणे जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या २ मार्च रोजी हि निवडणूक होणार आहे. 

तर व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर म्हणजेच येत्या सोमवार पासून अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे. मिलिंद सोबले यांची निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड ,शिरूर ,मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर आणि दौंड या अकरा तालुक्यांसाठी दूध उत्पादक सोसायटी यांचा प्रत्येकी एका गटातून एक संचालक निवडला जाईल. महिला संचालकासाठी दोन जागा असून, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती आणि इतर मागास वर्गासाठी प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.

महाराष्ट्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद सोबले यांची नियुक्ती केली. सोबले यांनी सहकारी निवडणूक प्राधिकरणाला सादर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिल्याचे पत्र प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिले आहे.

या निवडणूक कार्यक्रमात १४ तेव १८  फेब्रुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी असणार आहे. तर २१ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. तर २२ फेब्रुवारी रोजी वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. २२ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. तर ९ मार्चला वैध उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. २० मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ मतदान पार पडेल. तर दुसऱ्या दिवशी २१ मार्च रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

English Summary: Now the leader will again lay the foundation of the peasantry; There was another election Published on: 14 February 2022, 02:44 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters