1. बातम्या

मल्चिंग पेपरवर कांदा लागवड करून मिळवले दिडपट अधिक उत्पन्न; वाचा सविस्तर

अवकाळी पाऊस आणि शेती विरोधी विविध वातावरणातील बदल यामुळे शेतकरी नेहमीच अशाश्वत मेहनत करत असतो. शिवाय या आस्मानी संकटाना न घाबरता शेतकरी नेहमीच विविध प्रयोग शेतीत करतो. मागील वर्षी असाच एक अनोखा प्रयोग शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या धामनखेल गावात करण्यात आला आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Onion

Onion

अवकाळी पाऊस आणि शेती विरोधी विविध वातावरणातील बदल यामुळे शेतकरी नेहमीच अशाश्वत मेहनत करत असतो. शिवाय या आस्मानी संकटाना न घाबरता शेतकरी नेहमीच विविध प्रयोग शेतीत करतो. मागील वर्षी असाच एक अनोखा प्रयोग शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या धामनखेल गावात करण्यात आला आहे. 

पहिल्यांदा ५ एकरवर गोविंद जाधव यांनी हा प्रयोग केला होता. तर यावर्षी त्यांनी साडे सात एकरवर कांदा लागवड केली आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात १ हजार एकरहुन अधिक क्षेत्रात कांदा लागवड होत असते. या वर्षी देखील मोठ्या प्रमाणत कांदा लागवड जुन्नर परिसरात झालेली आहे.मात्र कांदा लागवडीची पारंपरिक पद्धत मोडीत काढत मागील वर्षीपासून जिल्ह्यासह जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी मल्चिंग पेपरवर कांदा लागवड होऊ लागली आहे. तालुक्यात जवळपास ३०० एकरहून अधिक ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला आहे.पाण्याचे नियोजन आणि कांदा उत्पादन क्षमता वाढावी याकरिता हा प्रयोग केल्याचे गोविंद जाधव यांनी सांगितले. सुरवातीला त्यांना तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मल्चिंग पेपर उपलब्ध करणे कठीण झाले. परंतू जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातून हे पेपर त्यांनी उपलब्ध केले. 

शेतात फणणी करून रोटरने माती लहान करून घेतली जाते. त्यानंतर काही खते एकत्रित करून त्याला खताचा डोस देण्यात येतो. त्यानंतर कांदा बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरला जातो. छिद्र असलेले मल्चिंग पेपर सध्या सहज उपलब्ध होतात. ४ x ४ इंचाची छिद्रांचा आकार असून एक पेपर बंडल हा १२०० फुटांचा असतो. तर  एका पेपरला ३२ हजार छिद्र असतात. एक एकरासाठी मल्चिंग पेपरचे ७ बंडल लागतात. ड्रिप पद्धतीने पाणी देण्यासाठी या बेडमध्ये १६ मिमी आकाराच्या दोन नळ्या वापरल्या जातात. या नळ्यामधूनच शेतीला पाणी पुरवठा तसेच खताचे डोस दिले जातात. या कांद्याना कमी पाणी लागते. यावर कमी प्रमाणात रोगराई पसरते. तसेच अनियमित पावसाचा फटका देखील या कांद्यना कमी प्रमाणात बसत असल्याचे जाधव यांनी सांगितले. शिवाय आपण पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड अशाप्रकारे कांदा लागवडीसाठी करावी तर इतर वेळी कोणत्याही प्रकारातील जमीन चालू शकते असे त्यांनी सांगितले. शिवाय या शेतीतीतून निघणारा कांदा काढणीनंतर योग्य पद्धतींने साठवल्यास ६ ते ८ महिने सहज टिकू शकतो. कांद्याला एक सारखा आकार आणि आकर्षकपणा सुद्धा चांगल्या प्रकारे मिळतो. शिवाय पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी भांडवलात आणि निम्म्या कामगार खर्चात हे पीक घेता येते. तर लहान मोठ्या आकाराऐवजी एका आकारात कांदा निर्माण होता. हि पद्धती कमी भांडवलात नेहमीपेक्षा दिडपट अधिक उत्पन्न देत असल्याचे जाधव यांनी सांगितले.  

मल्चिंग पेपरद्वारे केल्या जाणाऱ्या शेतीसाठी हवामान बदलानुसार सरासरी ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो. एक एकर कांदा लागवडीआधी खतांसाठी ५,००० रुपये, मल्चिंग पेपर १०,००० हजार रुपये, कांदा लागवडीसाठी मजुरी १०,००० हजार रुपये, खुरपणी व इतर मशागत १२,००० रुपये, फवारणी औषधे १२,००० तर पाण्यातून दिल्या जाणाऱ्या औषधांना ५००० रुपये खर्च येत असल्याचे गोविंद जाधव यांनी सांगितले.     

English Summary: Half the yield obtained by planting onions on mulching paper; Read detailed Published on: 14 February 2022, 02:04 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters