1. बातम्या

आता उसापासून तयार होणार जाम, आरोग्यासाठी आहे फायदेशीर..

उसापासून इतर बरेच उपपदार्थ बनवता येतात. मात्र 'उसाच्या रसाचा जाम' हे ऐकायला पण किती नवल वाटते. मात्र कोइमतूरच्या ऊस पैदास केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश जी. एस. यांच्या संशोधनामुळे हे शक्य झाले आहे. त्यांनी उसाच्या रसाचे परीक्षण, मूल्यवर्धन करून उसाच्या रसापासून 'केन जाम'ची निर्मिती केली.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
उसाच्या रसाचे परीक्षण, मूल्यवर्धन करून उसाच्या रसापासून 'केन जाम'ची निर्मिती .

उसाच्या रसाचे परीक्षण, मूल्यवर्धन करून उसाच्या रसापासून 'केन जाम'ची निर्मिती .

उन्हाळ्यात सर्वात जास्त थंड पेय म्हणून उसाचा रस अग्रेसर आहे. ऊस मुख्यत्वे गुळासाठी तसेच साखरेसाठी पिकवण्यात येणारं पीक आहे. भारत व ब्राझील देशांत प्रामुख्याने या पिकांची लागवड केली जाते. भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत. उसापासून तयार करण्यात येणारं तसेच आरोग्याला फायदेशीर असा उसाचा रस तर उन्हाळ्यात थंड पेय म्हणून सर्वाधिक जास्त घेतला जातो.

उसापासून इतर बरेच उपपदार्थ बनवता येतात. मात्र 'उसाच्या रसाचा जाम' हे ऐकायला पण किती नवल वाटते. मात्र कोइमतूरच्या ऊस पैदास केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश जी. एस. यांच्या संशोधनामुळे हे शक्य झाले आहे. त्यांनी उसाच्या रसाचे परीक्षण, मूल्यवर्धन करून उसाच्या रसापासून 'केन जाम'ची निर्मिती केली. नावीन्यपूर्ण व प्रक्रियायुक्त उत्पादने बरेच झालेले आपण पहिले आहेत. मात्र केन जाम हा भारतातील पहिलीच अशी निर्मिती आहे.

विविध फळांपासून तयार केलेले जाम बाजारात सहज उपलब्ध होतात. मात्र यात फळांचे गरे व साखर यांचे मिश्रण असते. उसापासून तयार करण्यात आलेल्या केन जाम मध्ये मात्र साखर या घटकाचा समावेश नाही. रसाचा पूर्णपणे वापर करून साखर न मिसळता हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे. उसापासून तयार करण्यात आलेल्या जाममध्ये पोटॅशिअम, सोडिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम यांसारखे खनिजे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

जाम उत्पादनाच्या उद्देशाने गाळप केलेल्या एका टन उसापासून ऊस उत्पादकांना सुमारे २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा दावा ऊस पैदास केंद्राचे वरिष्ठ डॉ. सुरेश जी. एस. यांनी केला आहे. उसाच्या रसाची पौष्टिकता आणि चव टिकवून ठेवून यामध्ये फळांच्या विविध चवींच्या घटकांचा समावेश करता येतो.

त्यामुळे विविध चवीचे जाम निर्मिती करणे सहज शक्य आहे. तसेच हे उत्पादन विकसित करत असताना अननस, चेरी, चॉकलेट, आले-लिंबू, आले व दालचिनी या चवींचेदेखील जाम तयार करण्यात आलेले असून याचा वापर ब्रेड, चपाती, इडली, डोसा आणि केक यांसारख्या खाद्यपदार्थांसह वापरला जाऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या;
आता गाय पाळण्यासाठी घ्यावा लागणार परवाना, जाणून घ्या काय आहे हा नवा नियम
शेतकऱ्यांना फायदाच फायदा! 'या' पिकाच्या निर्यातीमध्ये झाली मोठी वाढ
मोठी बातमी! या पद्धतीने e-KYC केली नाही तर PM Kisan चा 11 वा हफ्ता बँकेत जमा होणार नाही

English Summary: Now the jam will be made from sugarcane, it is beneficial for health. Published on: 23 April 2022, 05:43 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters