विविध फळांपासून बनवा आरोग्यवर्धक जॅम

Sunday, 03 May 2020 03:53 PM


भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि या कृषिप्रधान देशामध्ये एकूण लोकसंख्येच्या (७०-७५ टक्के) लोक शेती हा व्यवसाय करतात. फळे म्हणजेच खनिज व जीवनसत्त्वाचे कोठार आहे. त्याचप्रमाणे मानवी आरोग्याचे संरक्षक व संवर्धक आहेत. तेव्हा या फळांचा मानवी जीवनात समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. फळपीक हे अधिक फायदेशीर होण्यासाठी फळांचे प्रक्रियायुक्त पदार्थ जास्त उपयुक्त ठरतात.

फळप्रक्रियाद्वारे फळांसारख्या नाशवंत अशा शेतमालाचं टिकाऊ पदार्थांत रूपांतर करता येतं. यापासून काही सरळ व सोपे प्रक्रियायुक्त पदार्थ (जॅम) हे घरगुती पद्धतीने करता येतात. साखरमिश्रित आटवलेल्या फळांच्या रसाला किंवा गराला जॅम असे म्हणतात. ज्या फळांपासून चांगला गर निघतो त्यापासून जॅम बनविता येतो. त्यामुळे जॅम बनविण्यासाठी असा गर निघणाऱ्या फळांची निवड करणे गरजेचे आहे.

अननसाचा जॅम

साहित्य : अननसाचा गर १ किलो, साखर ७५० ग्रॅम, सिट्रिक अॅसिड ५ ग्रॅम.

कृती : सर्वप्रथम अननसाची फळे घेऊन त्याचा अनावश्यक भाग काढून टाकावा व गराचे तुकडे करावे. तुकडे केलेला गर मिक्‍सरमधून बारीक करावा व तो शिजण्यासाठी गॅसवर ठेवावा. गराच्या पाऊणपट साखर शिजत असलेल्या गरामध्ये टाकावी व गर हा सतत ढवळत राहावा. पहिली उकळी आल्यानंतर सायट्रिक अॅसिड टाकावे. गर हा घट्ट होत आल्यानंतर त्याचा टिएसएस (ब्रिक्स) व तापमान मोजावे. ब्रिक्स हा ६८ टक्के व तापमान १०२ सें.ग्रे.येईपर्यंत जॅम शिजू द्यावा. नंतर जॅमची प्लेट टेस्ट व ड्रॉप टेस्ट घ्यावी. सर्व टेस्ट योग्य आल्यानंतर जॅम तयार होईल. शेवटी तयार झालेल्या जॅममध्ये आवश्यकता असल्यास इसेन्स व खाण्याचा रंग टाकावा व गरम जॅम बाटलीमध्ये भरावा.

उंबराचा जॅम

साहित्य : फळाचा गर १ किलो, साखर ७५० ग्रॅम, सायट्रीक अॅसिड ६ ग्रॅम.

कृती : सर्व प्रथम उंबराची फळे घ्यावी व ती स्वच्छ धुवावी. नंतर त्याची साल काढावी. फळे ही मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावी. गर हा शिजण्यासाठी ठेवावा. गरामध्ये साखर टाकावी व सायट्रीक अॅसिड टाकावे. गर हा घट्ट होत आल्यानंतर त्याचा टिएसएस (ब्रिक्स) व तापमानावर मोजावे. ब्रिक्स हा ६८ टक्के व तापमान फळे १०२ सें.ग्रे. येईपर्यंत जॅम शिजू द्यावा. नंतर जॅमची प्लेट टेस्ट व ड्रॉप टेस्ट घ्यावी. सर्व टेस्ट योग्य आल्यानंतर जॅम तयार होईल. शेवटी तयार झालेल्या जॅम मध्ये आवश्यकता असल्यास इसेन्स व खाण्याचा रंग टाकावा व गरम जॅम बॉटलमध्ये भरावा.

चिकूचा जॅम

साहित्य : चिकूचा गर २०० ग्रॅम, साखर २०० ग्रॅम, सायट्रीक अॅसिड २ ग्रॅम.

कृती : सर्व प्रथम पिकलेली चिकूची फळे घेऊन ती धुवून घ्यावी व त्याचा अनावश्यक भाग काढून टाकावा (साल व बिया) चिकूच्या बारीक फोडी कराव्यात व गर मिक्‍सरमधून बारीक करावा. साखर गरामध्ये टाकून गर हा गॅसवर ठेवावा. पहिल्या उकळीनंतर सायट्रीक अॅसिड टाकावे. गर हा घट्ट होत आल्यानंतर त्याचा टिएसएस (ब्रिक्स) व तापमान मोजावे. ब्रिक्स हा ६८ टक्के व तापमान १०२ सें.ग्रे.येईपर्यंत जॅम शिजू द्यावा. नंतर जॅमची प्लेट टेस्ट व ड्रॉप टेस्ट घ्यावी. सर्व टेस्ट योग्य आल्यानंतर जॅम तयार होईल. शेवटी तयार झालेल्या जॅममध्ये आवश्यकता असल्यास इसेन्स व खाण्याचा रंग टाकावा व गरम जॅम बॉटलमध्ये भरावा.

आंब्याचा जॅम

साहित्य : पिकलेल्या आंब्यांचा गर १ किलो, साखर ७५० ग्रॅम, सायट्रीक अॅसिड ६ ग्रॅम.

कृती : आंबे स्वच्छ धुवून त्याचा गर काढावा. काढलेला गर मिक्‍सरमधून एकजीव करावा.  गर गरम करण्यासाठी गॅसवर ठेवावा व त्यामध्ये साखर टाकावी. पहिल्या उकळीनंतर सायट्रीक असिड टाकावे. गर हा घट्ट होत आल्यानंतर त्याचा टिएसएस (ब्रिक्स) व तापमान मोजावे. ब्रिक्स हा ६८ टक्के व तापमान १०२ सें.ग्रे. येईपर्यंत जॅम शिजू द्यावा. नंतर जॅमची प्लेट टेस्ट व ड्रॉप टेस्ट घ्यावी. सर्व टेस्ट योग्य आल्यानंतर जॅम तयार होईल. शेवटी तयार झालेल्या जॅममध्ये  आवश्यकता असल्यास इसेन्स व खाण्याचा रंग टाकावा व गरम जॅम बॉटलमध्ये भरावा.

जांभूळ जॅम

साहित्य : जांभुळाची फळे ५०० ग्रॅम, साखर ४०० ग्रॅम, सायट्रीक अॅसिड २.५ ग्रॅम.

कृती : जॅम तयार करतांना सर्वप्रथम फळे धुवून घ्यावीत व ती ब्लँचिंग करून घ्यावी. (३ ते ४ मिनिटे) ब्लँचिंग केलेल्या सर्व फळांची साल काढून घ्यावी व ती फळे हाताने कुसकरून त्यांच्या बिया वेगळ्या करून घ्याव्यात. गर हा मिक्‍सरमधून एकजीव करून घ्यावा. तो गर जॅम तयार करण्यास गॅसवर ठेवावा. गर शिजत असतांना साखर टाकावी. पहिल्या उकळीनंतर सायट्रीक अॅसिड टाकावे. गर हा घट्ट होत आल्यानंतर त्याचा टिएसएस (ब्रिक्स) व तापमान मोजावे. ब्रिक्स हा ६८ टक्के व तापमान १०२ सें.ग्रे. येईपर्यंत जॅम शिजू द्यावा. नंतर जॅमची प्लेट टेस्ट व ड्रॉप टेस्ट घ्यावी. सर्व टेस्ट योग्य आल्यानंतर जॅम तयार होईल. शेवटी तयार झालेल्या जॅममध्ये आवश्यकता असल्यास इसेन्स व खाण्याचा रंग टाकावा व गरम जॅम बॉटलमध्ये भरावा.

लेखक:
शैलेंद्र कटके, प्रा. हेमंत देशपांडे आणि प्रा. डॉ. अरविंद सावते
अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
9970996282

fruits fruit jam जीवनसत्व vitamin mango jam chikoo jam pineapple jam jamun jam आंबा जॅम अननस जमॅ जांभूळ जमॅ चिक्कू जमॅ
English Summary: Make healthy jams from different fruits

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.