
now possible to purchase and selling one or two guntha land aurangabad bench decision
जमीन खरेदी विक्री व्यवहाराच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता काही तुकड्यांमध्ये देखील तुम्हाला जमीन खरेदी करता येणे शक्य होणार आहे.
आता यामध्ये तीन गुंठ्यांचे अट असणार नाही. कारण तुकडाबंदी चे नियम औरंगाबाद खंडपीठाकडे रद्द करण्यात आले आहे त्यामुळे खरेदीखत नोंदणीचा व्यवहार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अगोदर तुकडाबंदी नियमामुळे होणारा त्रास आता संपणार असून एक ते दोन गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणे आता शक्य होणार आहे.
औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील तुकडा बंदीचे नियम आणि परिपत्रक केले रद्द
औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील तुकडाबंदी चे नियम आणि परिपत्रक रद्द केले त्यामुळे आता खरेदीखत नोंदणीचा व्यवहार सुरू होण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही. राज्य मुद्रांक विभागाने 12 जुलै 2021 पासून जमीन तुकडा बंदी नियम लागू केले होते. त्यात एन ए 44 जमीन वगळता आता सर्व प्रकारची घरे, प्लॉटची रजिस्ट्री बंद होती. तसेच जमिनीचे तुकडे करून देखील विकता येत नव्हते त्यांचीही रजिस्ट्री बंद होती.
यासाठी महाराष्ट्र नोंदणी नियम क्रमांक 44 (1)(ई )हा नियम ठेवला होता.त्यामुळे अशी घरं आणि जमिनीची विक्री खरेदी व्यवहार बॉण्ड पेपर वर करण्यात येत होती. त्यामुळे या विषयाच्या विरोधात काही लोकांनी खंडपीठात याचिका दाखल केली व त्यावर औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तुकडाबंदी मुळे होणारा जो त्रास होता तो आता कायमचा संपणार आहे.
काय होता तुकडाबंदीचा नियम?
जमिनीचा पट्टा एक एकर असेल तर त्याचे तुकडे करून त्यातील एक ते दोन गुंठे जमीन विकता येत नव्हती, त्याची रजिस्ट्री होत नव्हती त्यामुळे जमिनीचे लेआऊट केल्यानंतरच रजिस्ट्रेशनची मुभा होती किंवा जिल्हाधिकार्यांची परवानगी घेऊन रजिस्ट्रेशन होऊ शकत होते.
परंतु आता औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिल्यानंतर या त्रासापासून सुटका झाली आहे.
(स्रोत-झीन्यूस)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:फायदेशीर शोध! कमी खर्चात केली सोलर स्टोव्हची निर्मिती,आता गॅस मध्ये होईल बचत
नक्की वाचा:बटाट्याच्या रोपाचा फोटो काढा आणि माहिती करा रोग आहे की नाही, एक संशोधन
Share your comments