प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांना पैसे काढण्यासाठी बँक किंवा एटीएम मध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
ते घरबसल्या पैसे काढू शकतील. 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसानचा 11 हप्ता जारी केला. या अंतर्गत 10 कोटींहून अधिक शेतकरी बँक खात्यात 21000 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. या योजनेअंतर्गत मिळालेले पैसे शेतकऱ्यांना बँकेत न जाता काढता येणार आहे. यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. पोस्ट विभागाने याची सुरुवात केली आहे.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम सहज उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेतला आहे. टपाल विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांना आता 'पीएम किसान सन्मान निधी' चे पैसे त्यांच्या घरी मिळू शकतील.
वाराणसी विभागाचे पोस्टमास्टर जनरल कृष्ण कुमार यादव म्हणाले, "किसान सम्मान निधिमधून पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेच्या शाखेत किंवा एटीएम मध्ये जावे लागते आणि ग्रामीण भागात ते अवघड आहे. शेतकऱ्यांना ते सोपे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
नक्की वाचा:पंजाबच्या गाई जास्त दूध देतात आणि आपल्या का कमी देतात, शेतकऱ्यांनो वाचा करणे
1) टपाल विभागाने विशेष मोहीम सुरू केली :
यादव म्हणाले की, पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळालेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी पोस्ट विभाग 'आपका बँक, आपके द्वार' मोहीम सुरू करत आहे.
त्यांनी सांगितले की, शेतकरी घरीबसल्या आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS) सह त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यातून किसान सन्मान निधी चे पैसे काढू शकतात. त्यासाठी टपाल प्रतिनिधी त्यांच्या घरी येणार आहे.
ही मोहीम 4 जून पासून सुरू होणार असून 13 जून पर्यंत चालणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात. हे रुपये थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात.
दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षातून तीनदा जमा होतो.पंतप्रधान मोदी स्वतः दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांसाठी पैसे देतात.
नक्की वाचा:अतिरिक्त उसाबाबत मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत, पुण्यात साखर परिषदेचे आयोजन
2) ई-केवायसी ची अंतिम तारीख वाढवली
पी एम किसान योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने ई-केवायसी करण्याची तारीख वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत ई-केवायसी करता येणार आहे.
यापूर्वी या कामासाठी 31 मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी मंत्रालयाने शेवटची तारीख पुन्हा वाढवली आहे जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना अद्याप ई-केवायसी करता आलेले नाही त्यांना ते पूर्ण करता येईल.
Share your comments