1. बातम्या

दादांनो! घर बांधायचे असेल तर आत्ताच आहे सुवर्णसंधी, स्टीलच्या दरात प्रचंड घसरण,वाचा नवीन दर

स्वतःचे घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. पण घर बांधणे खूपच खर्चिक बाब झाली आहे. आपल्याला माहित आहेच कि घरबांधणीसाठी लागणारे सगळे मटेरियल्स प्रचंड प्रमाणात महागल्यामुळे घर बांधणे तितकेसे सोपे राहिले नाही. घरबांधणीमध्ये सगळ्यात जास्त खर्च येत असेल तर तो स्टीलवर. परंतु घरबांधणीत आवश्यक असलेल्या स्टीलच्या दरात आणि त्यासोबत घर बांधण्यामधील महत्वाचे सिमेँट आणि वाळुच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
steel rate is decrease

steel rate is decrease

स्वतःचे घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. पण घर बांधणे खूपच खर्चिक बाब झाली आहे. आपल्याला माहित आहेच कि घरबांधणीसाठी लागणारे सगळे मटेरियल्स प्रचंड प्रमाणात महागल्यामुळे घर बांधणे तितकेसे सोपे राहिले नाही. घरबांधणीमध्ये सगळ्यात जास्त खर्च येत असेल तर तो स्टीलवर. परंतु घरबांधणीत आवश्यक असलेल्या स्टीलच्या दरात आणि त्यासोबत घर बांधण्यामधील महत्वाचे सिमेँट आणि वाळुच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे.

त्यामुळे या परिस्थितीत घर बांधायचे स्वप्न कमी खर्चात पूर्ण होऊ शकते अशी स्थिती आहे. जर आपण यामध्ये गेल्या आठवड्याभरात असलेल्या दराचा विचार केला तर तब्बल सात हजार रुपयांनी भाव स्वस्त झाले आहेत.

नक्की वाचा:ग्राहकांसाठी खुशखबर! सोने झाले स्वस्त जाणून घ्या हे नवे दर आणि आता अशी ओळखा सोन्याची शुद्धता

एकंदरीत स्टीलच्या भावाची परिस्थिती

 जर आपण बुधवारच्या दराचा विचार केला तर प्रति टन चार ते पाच हजार रुपयांनी स्टील खाली आले आहे. यामध्ये ब्रँडेड बार 67 हजार रुपये प्रति टन आणि स्थानिक ब्रँडचे बार 62 हजार रुपये दराने विकले जात आहेत. त्यामुळे आता घर बांधणाऱ्याना मोठा दिलासा मिळाला असून लोखंड देखील बुधवारी आठवड्याच्या तुलनेत प्रतिटन सात हजारांनी घसरले आहे.

नक्की वाचा:Reality:केंद्र सरकारने ऊसाची एफआरपी वाढवली आणि बेसरेटही, नेमके शेतकऱ्यांच्या पदरात पडणार काय?

स्टीलचे ताजे दर

 सरकारने पोलादावरील निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे देशांतर्गत बाजारात स्थिर उत्पादनांच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली असून हेच प्रमुख कारण बारच्या किमती घसरण्यामागे आहे. जर आपण या एकंदरीत झालेल्या घसरणीचा अंदाज लावला तर एप्रिलमध्ये एकेकाळी बारची किरकोळ किंमत 82 हजार रुपये प्रतिटनावर पोहोचली होती, जी आता 62 ते 63 हजार रुपये प्रतिटन  झाली आहे.

तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये ब्रँडेड बारच्या किमतीतही प्रतिक्विंटल पाच ते सहा हजार रुपयांनी घट आली आहे. सध्या ब्रँडेड बारची किंमत 92 ते 93 हजार रुपये प्रतिटनवर आली आहे. याच किमतीचा मागच्या महिन्याभरापूर्वीचा विचार केला तर त्यांची किंमत 98 हजार रुपये प्रतिटनावर पोहोचली होती.

नक्की वाचा:काय म्हणता! शेतकऱ्यांना पंचनाम्यापूर्वीच मिळणार नुकसानभरपाईचे 25 टक्के रक्कम? समजून घेऊ पिक विमा योजनेतील तरतूद

English Summary: now construction materiel is so cheap so chance to build home Published on: 06 August 2022, 10:39 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters