1. बातम्या

Reality:केंद्र सरकारने ऊसाची एफआरपी वाढवली आणि बेसरेटही, नेमके शेतकऱ्यांच्या पदरात पडणार काय?

केंद्र सरकारने नुकताच हंगाम 2022-23 या साठी गाळपास येणाऱ्या उसाची एफआरपी टनामागे दीडशे रूपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यासोबतच साखर उताऱ्याचा जो काही बेस रेट असतो, त्यामध्ये देखील 0.25 टक्क्यांनी वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात नेमके किती एफआरपीचा फायदा पडेल हे देखील महत्त्वाचे आहे. या बेसरेट वाढवल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्षात प्रतिटन 113 रुपये जास्तीचे पडणार आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
reality behind growth frp

reality behind growth frp

केंद्र सरकारने नुकताच हंगाम 2022-23 या साठी गाळपास येणाऱ्या उसाची एफआरपी टनामागे दीडशे रूपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला.  परंतु त्यासोबतच साखर उताऱ्याचा जो काही बेस रेट असतो, त्यामध्ये देखील 0.25 टक्क्यांनी वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात नेमके किती एफआरपीचा फायदा पडेल हे देखील महत्त्वाचे आहे. या बेसरेट वाढवल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्षात प्रतिटन 113 रुपये जास्तीचे पडणार आहेत.

म्हणजेच केंद्र सरकारने  दीडशे रुपयांची वाढ दाखवली परंतु प्रत्यक्षात 113 रुपये दिल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

नक्की वाचा:ब्रेकिंग! उसाच्या एफआरपीत प्रतिटन 150 रुपयांनी वाढ, शेतकऱ्यांना होईल फायदा

म्हणजेच हा बेस रेट वाढवल्याने प्रतिटन शेतकऱ्यांना 37 रुपयांचा फटका बसणार आहे. तसे आपण साखर उताऱ्याचा विचार केला तर तो राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच अंशी सारखा नसतो.

उदाहरणच घ्यायचे झाले तर कोल्हापूर जिल्ह्यात साडेबारा टक्के साखर उतारा सरासरी बसतो तर उर्वरित ठिकाणी 11.25 उतारा बसतो. म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सोडून इतर ठिकाणचा विचार केला तर राज्यात 2655 रुपये एफआरपी शेतकऱ्यांना मिळते.

नक्की वाचा:Gas Cylinder Subsidy: तुम्हाला गॅस सिलिंडरवर सबसिडी किती मिळते? जाणून घ्या घरबसल्या..

 एफआरपी उत्पादन खर्चावर द्यावी अशा प्रकारची मागणी

 जर आपण शेतीच्या बाबतीत विचार केला तर खतांचे वाढलेले दर तसेच पाणी व वीज बिलामध्ये झालेली वाढ यामुळे शेतकरी आधीच संकटात सापडले असून त्यामध्ये नैसर्गिक संकट हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजल्या सारखे कायम येत असते त्यामुळे ते कायम संकटात असतात

आणि वरून उसाचा उत्पादन खर्च व मिळणारा भाव याचा जर विचार केला तर हे गणित कुठेच जुळत नसल्यामुळे एफआरपी ही उत्पादन खर्चावर आधारित द्यावी अशी मागणी काही महिन्यांपूर्वी कृषिमूल्य आयोगाने केली होती.

येणाऱ्या 2022-23 या हंगामासाठी प्रति टन दीडशे रुपयांची वाढ करतात तीन हजार पन्नास रुपये एफआरपी देण्याची केंद्र सरकारकडे शिफारस केली होती.  केंद्र सरकारने त्यास मान्यता दिली परंतु साखर उताऱ्याचा बेस 0.25 टक्क्यानी वाढवला.

नक्की वाचा:पावसाळी अधिवेशनात सुजय विखेंचा कामांचा धडाका, नगर जिल्ह्यात वाहणार विकासाची गंगा

English Summary: goverment growth frp 150 rupees per tonn but how mant benifit get to farmer? Published on: 05 August 2022, 10:27 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters