
winner bullock cart race mercedes car prize
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर सध्या अनेक ठिकाणी शर्यतींचे आयोजन केले जात आहे. यामुळे बैलगाडाप्रेमी आनंदात आहेत. सध्या देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पिंपरी चिंचवड येथे सुरु आहे. यामध्ये कोटींची बक्षिसे देण्यात येणार आहेत. आता बैलगाडा शर्यतीबाबत आमदार नितेश राणे यांनी मोठी घोषणा केलीय. भाजप आमदार महेश लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांवर मंगळवारी बक्षिसांची खैरात करण्यात आली.
यामध्ये आमदार नितेश राणे म्हणाले, की ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, त्या वर्षी महेश लांडगे दादा यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीच्या घाटाच्या राजाला (फायनल सम्राटाला) माझ्याकडून एक मर्सिडिज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल', अशी घोषणाच नितेश राणे यांनी केलीय. यामुळे बैलगाडाप्रेमींचे याकडे लक्ष लागले आहे.
असे असताना आता नितेश राणेंच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा फडणवीस आणि मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु झाली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात काही बदल होणार का? हे लवकरच समजेल. दरम्यान महेश लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांना एक जेसीबी, बोलेरो, ट्रक्टर, बुलेट आणि अन्य दुचाकींचा समावेश होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही शर्यत पार पडली.
'बैल कधी एकटा येत नाही, सोबत नांगर घेऊन येतो'
त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करुन ही मोठी घोषणा केलीय. मात्र, ही घोषणा करताना त्यांनी एक अटही ठेवली आहे. यामुळे आता ही अट पूर्ण होणार का आणि नितेश राणे मर्सिडिज गाडी बक्षीस म्हणून देणार का हे लवकरच समजेल. अनेक ठिकाणी सध्या वरचढ होऊन या स्पर्धा भरवण्यात येत आहेत. यामध्ये बक्षिसांसाठी मोठी चढाओढ सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी!! भारतामध्ये लवकरच येणार लोकसंख्या नियंत्रण कायदा, मोदी सरकार घेणार मोठा निर्णय
बजाजने सर्वात स्वस्त बाइक केली बंद, सर्वांना परवडणारी गाडी बंद झाल्याने अनेकांची नाराजी
आता तुमची गाडी कधीच पंम्चर होणार नाही, जाणून घ्या सविस्तर
Share your comments