1. बातम्या

पूर्व मध्य अरबी समुद्रात निसर्ग हे तीव्र चक्रीवादळ

नवी दिल्ली: पूर्व मध्य अरबी समुद्रातले निसर्ग हे तीव्र चक्रीवादळ गेल्या सहा तासात उत्तर पूर्वेकडे ताशी 13 किलोमीटर वेगाने सरकले आहे. दुपारपर्यंत रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळून ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह तीव्र चक्रीवादळाची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मुंबई आणि गोवा इथल्या डॉप्लर वेदर रडार वर याचा सातत्याने वेध घेतला जात आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


नवी दिल्ली:
पूर्व मध्य अरबी समुद्रातले निसर्ग हे तीव्र चक्रीवादळ गेल्या सहा तासात उत्तर पूर्वेकडे ताशी 13 किलोमीटर वेगाने सरकले आहे. दुपारपर्यंत रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळून ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह तीव्र चक्रीवादळाची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मुंबई आणि गोवा इथल्या डॉप्लर वेदर रडार वर याचा सातत्याने वेध घेतला जात आहे.

नुकसान होण्याची शक्यता

  • कच्ची घरे आणि झोपड्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता, घरावरचे पत्रे उडून जाण्याची शक्यता. 
  • वीज आणि  दूरध्वनी तसेच संपर्क साधनांच्या तारांचे नुकसान होण्याची शक्यता. 
  • रस्त्यांचे नुकसान होण्याची शक्यता, मार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता. 
  • मोठ-मोठी झाडे, उन्मळून पडण्याची, फांद्या कोसळण्याची शक्यता. 
  • केळी, पपया झाडांचे नुकसान.
  • किनारी पिकांचे मोठे नुकसान. 
  • मिठागाराचे नुकसान. 

वादळ धडकल्यानंतर:

हे तीव्र चक्रीवादळ धडकल्यानंतर सहा तास त्याची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावा मुळे पुणे, अहमदनगर जिल्ह्यात ताशी 60-70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हा वेग 80 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. बीड, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात ताशी 55-65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या पुणे, अहमदनगर, नाशिक औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात नुकसान होण्याची शक्यता आणि त्यासंदर्भात घ्यायची काळजी

  • वीज आणि संपर्क साधनाच्या तारांचे किरकोळ नुकसान.
  • कच्ची घरे आणि रस्त्यांचे काही नुकसान. 
  • झाडाच्या फांद्या आणि छोटी झाडे कोसळण्याची शक्यता. 
  • केळी आणि पपई झाडांचे नुकसान. 
  • संबधित भागातल्या लोकांनी घरातच राहावे.

(Please see details and UPDATED graphics in this link here)

Link of animations of cyclone Nisarga
Link of animations of cyclone Nisarga
Link of Video of DWR Goa SCS NISARGA

English Summary: Nisarga is a severe Cyclone in the East Central Arabian Sea Published on: 03 June 2020, 08:03 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters