शेतमालाचे उत्पादन अधिकाधिक वाढवण्यासाठी शेतकरी बरेच प्रयत्न करीत असतात. मात्र बऱ्याच कारणास्तव उत्पादनात घट होते. अर्थात त्याला आपत्कालीन परिस्थिती, आर्थिक गोष्टी यासारखी बरीच कारणे असतात. मात्र शेतीव्यवस्थापन आणि पिकांचे पूर्वनियोजन शेतकऱ्यांना उत्पादन क्षेत्रात वाढ होण्यास मदत करते. मात्र पेरणीपासून काढणीपर्यंत पिकांचे नीट संगोपन करावे लागते. त्यात वाढत्या किडींच्या प्रादुर्भावाला आटोक्यात ठेवल्यास उत्पादनात भर पडू शकते.
मावा, फुलकीडे, पांढरी माशी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वेलवर्गीय पिकांवर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत.अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांची भूमिका आणि पूर्वनियोजन महत्वाचे ठरणार आहे. शिवाय किडींचे वेगवेगळे प्रकार असतात. पिकांवरील मावा कीड ही हिरवट पिवळसर रंगाची असते. ही कीड पानाखाली मोठ्या प्रमाणात आढळून येते. मावा कीड पानांखालील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पिवळसर पडतात. यातूनच झाडाची वाढ खुंटते.
शिवाय ही कीड आपल्या शरीरातून चिकट गोड पदार्थ बाहेर टाकते परिणामी पाने चिकट होऊन त्यावर बुरशी चढते व अन्नप्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढल्यास करपा सारख्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. साधारण एक मिमी लांब पिवळसर अशा रंगाचे हे किडे पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात. कोरड्या हवामानात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो.
पिवळसर रंगाची आणि आकाराने सूक्ष्म असणारी पांढरी माशी प्रौढ पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पाने पिवळी पडतात. शिवाय या किडीमार्फत बाहेर पडणाऱ्या चिकट पदार्थामुळे पानांवर काळी बुरशी चढून पाने काळी पडू लागतात. शिवाय ही कीड विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते त्यामुळे अन्ननिर्माण प्रक्रियेत माढा निर्माण होते.
यावर तोडगा म्हणून भाजीपाला पिकास पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा. पिकांना पाणी देत असताना शक्यतो सकाळी, सायंकाळी किंवा रात्री पाणी द्यावे. वेलवर्गीय पिकांच्या बगलफुटी काढून टाकाव्यात तसेच फुले येण्याच्या काळात पाण्याचा अतिवापर टाळावा. रासायनिक फवारणी करावी. अधिक पीक उत्पादनासाठी किडींच्या प्रादुर्भावाला वेळेत आळा घालणे गरजेचं आहे.
महत्वाच्या बातम्या;
मराठवाड्यावर दुष्काळात तेरावा महिना! आता शेतकऱ्यांनी करायचे तरी काय?
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितले महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे खरे कारण, म्हणाले शरद पवार..
शेतकऱ्यांनो 'या' म्हशीच्या जातींचे करा संगोपन, होईल बक्कळ फायदा..
Share your comments