वेलवर्गीय उन्हाळी भाजीपाला पिकांसाठी काय कराल उपाय योजना

17 April 2021 04:59 PM By: KJ Maharashtra
वेलवर्गीय उन्हाळी भाजीपाला

वेलवर्गीय उन्हाळी भाजीपाला

वेलवर्गीय भज्यामध्ये प्रामुख्याने काकाडी, कारली, दुधी, भोपळा व घोसळी या प्रमुख भाज्याचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे दर्जेदार आणि चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन मिळवण्याकरीता वेलाला मंडप किंवा तारेचा ताटीचा आधार देता येतो. वेलींना जर चांगला आधार मिळाला तर त्याची वाढ चांगली होते.

आधारासाठी मंडप व ताटी पद्धत

वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यामुळे फळे जमिनीपासून ४ – ६ फुट उंची वर वाढतात. फळे लोंबकळत राहत असल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्य प्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळाचा रंग सारखा आणि चांगला राहतो. फळांची तोडणी, औषधं फवारणी ही कामे सुलभ होतात.

मंडप उभारणी

१ मंडप उभारणी करतांना डबांचा वापर करतात डबा कुजणार नाही यासाठी डबांचा जो भाग जमिनीत गाडला जाईल त्यावर डांबर लावावे.

२ मंडप पद्धती मध्ये दोन ओळीतील अंतर १० ते १२ फुट आणि दोन वेलीतील अंतर तीन फुट ठेवावे.

३ २० ते २५ फुट अंतरावर पाट बांधणी सुतळीने करावी. सुतळीचे एक टोक वेलाचा खोळा जवळ काठीच्या आधाराने बांधावे तर दुसरे टोक तारेस बांधावे.

४ वेलची वाढ ५ फुट होईपर्यंत वेलाची बगलफुट व ताणवे काढावे. मुख्य वेल मंडपावर पोचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा.

 

हवामान व जमीन

भोपळा, कारली, काकाडी या सर्व वेलवर्गीय पिकांना उष्ण आणि कोरडे हवामान पोषक असते. या वेलवर्गीय पिकांना मध्यम ते भारी योग्य पाण्याचा निचरा होणारी जमिनीची निवड करावी.

पाणी व्यवस्थापन

पिकांची उगवणी वेळेस जमीन ओलवावी तसेच उगवल्यावर ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाळी पाळीणे पाणी द्यावे.

पिकांची नावे   हंगाम  सुधारित जाती  बियाणे प्रमाण हेक्टरी (kg)     पिकांचा कालावधी (दिवस) उप्तादन

( टन )

कारले  एप्रिल – जून  को-लॉंग व्हाईट,फुले ग्रीन गोल्ड २-२.५ १८०- १८०-२०० २०-२५

दुधी भोपळा मार्च सम्राट,नवीन पुसा समर,प्रोलीफिक लॉग १-१५  १००-१२० १५-२०

 

काकडी जानेवारी पुन खीर,हिमांगी,फुले शुभांगी पोन सेंट १-१५   १००-१२०       १५-२०

दोडका  कारल्या पेक्षा १० ते १५ दिवस उशिरा   पुसा न्सदार,कोकण हरित फुले सुचेता   २-२५     ४१०-१५००      १५-२०

तांबडा भोपळा अरका सुर्यमुखी, अरक

काढणी-

फळे कोवळी असतानाच काढणी करावी म्हणजे बाजारभाव चांगला मिळतो.

vegetables भाजीपाला उन्हाळी भाजीपाला
English Summary: What to do for vine summer vegetable crops

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.