सध्या शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. सध्या उन्हाळा सुरु आहे. आणि पाऊस येण्यास अजून खूप अवधी आहे. असे असताना शेतीच्या मशागतीची कामे सध्या सुरु आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. मशागतीच्या काळात शेतकऱ्यांना पीककर्जाची गरज भासत असते. पीक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया काही शेतकऱ्यांना फार अवघड वाटते. मात्र, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करुन उत्पादनात वाढ व्हावी हा यामागचा उद्देश आहे.
सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. त्यामुळे जास्त शेतकऱ्यांचा भर याच पिकावर असतो त्यामुळे यंदा हेक्टरी सोयाबीनसाठी 53 हजार 900 रुपये ठरवून देण्यात आले आहेत तर उसासारख्या नगदी पिकासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
सध्या रब्बी आणि खरीप हंगामात (National Bank) राष्ट्रीयकृत बॅंकांना पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट हे ठरवून दिले. याबाबत निर्देश राज्य सरकारने बॅंकांना दिले आहेत. यामुळे आता कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. तसेच ही प्रक्रिया 30 जूनपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. या कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमध्ये कामे उरकून घ्यायला मदत होणार आहे.
यामध्ये 12 महिन्यात परतफेड करणाऱ्यांसाठी सूट दिली जाणार आहे. खरीप हंगाम दोन महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. त्याअनुशंगाने कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. यामुळे प्रशासन कामाला लागले आहे. सेवा सहकारी बॅंका तसेच राष्ट्रीयकृत बॅंकाकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळते.
पीक कर्जासाठी त्या बॅंकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जही करु शकतात. शिवाय बॅंकांना काही गावे ही दत्तक दिली गेली आहेत. त्यानुसार त्या संबंधित गावांना कर्जपुरवठा करणे हे बॅंकेचे काम आहे. यामुळे नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास काही अडचण येणार नाही.
यामध्ये शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8 अ, शेतीचा नकाशा, फेरफार, मुल्यांकन म्हणजेच व्हॅल्युनेशन, सर्व रिपोर्ट, आधार कार्ड झेरॉक्स आणि 3 फोटो हे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे इतर कर्ज देखील यावेळी बघितले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगामाच्या पूर्वतयारी बैठकीत याबाबत बँकांना सूचना दिल्या आहेत. यामुळे गरज असलेल्या शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
महत्वाच्या बातम्या;
साखर कारखान्यांबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले ज्यांच्यात धमक असेल त्याने..
शेतकरी आत्महत्या करतील या गडकरींच्या वक्तव्यावर राजू शेट्टी आक्रमक, म्हणाले व्वा गडकरी साहेब..
शेतकऱ्याचा नादच खुळा! डाळिंबाच्या संरक्षणासाठी अनोखी शक्कल, राज्यातच चर्चा...
Share your comments