नुकतीच देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडली. ही बैलगाडा शर्यत पुणे जिल्ह्यात भरवण्यात आली होती. दीड कोटींचे बक्षीस,सगळ्यांना जेवण, बैलांची तपासणी अशी देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत रंगली होती. बैलगाडा शर्यतीतून साधलं गेलेलं राजकारण कुणापासून लपलेलं नाही. बैलगाड्यांच्या शर्यतीबरोबर नेत्यांच्यात देखील मोठ मोठ्या इनामांची स्पर्धा भरली होती.
भाजप नेते महेश लांडगे आणि त्यांनतर कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी बैलगाडा शर्यत भरवली. मात्र पुणे जिल्ह्यात महेश लांडगेंनी भरवलेली बैलगाडा शर्यत ही देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ठरली. यातील पहिले बक्षीस जेसीबी, तर दुसरं बक्षीस होतं बोलेरो, तिसरं ट्रॅक्टर,आणि चौथं बक्षीस होतं दोन बुलेट तसेच नंतरच्या बक्षीसांमध्ये तब्बल 114 मोटरसायकली होत्या.
कर्जतमधील बैलगाडा शर्यत ही २२ लाख रुपयांच्या बक्षीसांची होती.पण विशेष म्हणजे भाजपनं भरवलेल्या सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीतील बक्षिसांचे मानकरी मात्र राष्ट्रवादीच ठरले आहे. बैलगाडा शर्यतीत ज्या मालकाने जेसीबी मशीन जिंकलं ते राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव रामनाथ वारिंगे आहेत. म्हणजे स्पर्धा भरवली भाजपनं आणि त्याची लयलूट केली राष्ट्रवादी नेत्यानं. शिवाय दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवणारे देखील राष्ट्रवादीचे नेते आहेत.
दुसरं बक्षीस होतं बोलेरो. व त्याचे मानकरी ठरले आहेत राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनिल शेळके. सुनिल शेळके यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी खांद्यावर उचलत मिरवणूकदेखील काढली. त्यामुळे सध्या भाजपने भरवलेल्या स्पर्धेत राष्ट्रवादी जिंकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भाजपच्या घाटात राष्ट्रवादीचा जलवा असला, तरी राजकारणापालिकडे जाऊन मी त्याकडे पाहतो, अशी प्रतिक्रिया आमदार सुनिल शेळके यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
मोठ्या मनाची कोंबडी; भर वादळात दिला मांजरीच्या पिल्लांना आसरा
शिवाय हा शेतकऱ्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्यामुळे बैलांच्या या खेळात सहभागी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "बैलगाडा शर्यतीवर आतापर्यंत बंदी होती मात्र
बंदी हटवल्यानंतर पहिल्याच स्पर्धेत लोकांमध्ये बराच उत्साह होता. देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीत एकूण 1200 बैलगाडे धावले असून या शर्यतीला
अर्थकारण व राजकारणाची जोड आहे'.
महत्वाच्या बातम्या:
आता मोंदींचे 2 हजार थेट तुमच्या घरी येणार; बँकेत जाण्याचा त्रासही मिटणार
पीक कर्जाबाबत जिल्हा प्रशासानाचा पुढाकार; 15 दिवसांमध्ये वाढणार पीककर्जाचा आकडा
Share your comments