1. बातम्या

नाशिकचे द्राक्ष फॉरेन रवाना! युके, दुबईला द्राक्षाची निर्यात; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण देशात विख्यात आहे. त्यामुळे नाशिक वाईस सिटी म्हणून ओळखली जाते. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत द्राक्षाची लागवड केली जाते. महाराष्ट्राच्या एकूण द्राक्ष उत्पादनापैकी सुमारे 70 टक्के द्राक्षाचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्षाची विदेशात निर्यात केली जाते. जिल्ह्यातील दिंडोरी तालुका निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी ओळखला जातो. तालुक्यातील एका युवा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची द्राक्ष परदेशात रवाना करण्यासाठी तयारी जोमात सुरू झाली आहे. तालुक्यातील युवा शेतकरी बाळासाहेब घडवजे यांची द्राक्षे निर्यातदार व्यापारी यांच्या मार्फत युरोप व दुबईमध्ये रवाना करण्यासाठी लगबग सुरु झाल्याचे नजरेस पडत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
grape export

तालुक्यातील वणी कळवण रस्त्यावर बाळासाहेबांचा तेरा एकर चा द्राक्ष भाग आहे. त्यांनी सोनाका व थॉम्सन या जातींची द्राक्षाची लागवड केली आहे. आता बाळासाहेबांच्या द्राक्षाची हार्वेस्टिंग सुरू आहे. बाळासाहेबांनी द्राक्ष निर्यातीची माहिती देताना सांगितले की, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाच्या नियमास अनुसरून द्राक्षला अपेडाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सुमारे पाच किलो द्राक्षे हैदराबाद पाठवावी लागतात. हैदराबाद मधून सकारात्मक रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर निर्यातदार व्यापारी द्राक्ष बागांची पाहणी करतात व तद्नंतर द्राक्ष बागांची काढणी सुरू होते.

काढणी केलेली द्राक्ष एका खास कंटेनरमधून कोल्ड स्टोरेज मध्ये हालवण्यात येतात. त्यानंतर कोल्ड स्टोरेज मधून द्राक्ष मुंबईच्या बंदरावर नेले जातात आणि मग मुंबईच्या पोर्ट वरून द्राक्ष जहाजांद्वारे विदेशात रवाना केली जातात. एवढा आटापिटा करून देखील निर्यातक्षम द्राक्षांनाही अपेक्षा एवढा भाव मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी नाराज असल्याचे समजत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचा मते, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्यासाठी सुमारे 75 रुपये किलो उत्पादन खर्च येतो. त्यामुळे उत्पादनावर होणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याचा समन्वय बसत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातक्षम द्राक्ष पिकवून देखील चांगला मोबदला मिळत नसल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी सांगत आहेत.

शेतकरी मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी पिंपळगाव येथे द्राक्ष बागायतदारांचे एक महत्वपूर्ण बैठक भरवण्यात आली होती. द्राक्ष बागायतदारांचे या बैठकीस निर्यातक्षम द्राक्षांचे बाजार भाव निश्‍चित करण्यात आले होते. मात्र असे असले तरी सध्या द्राक्ष बागायतदारांना ठरवण्यात आलेल्या दरापेक्षा कमी दराने द्राक्ष विक्री करावी लागत आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण या समवेतच पडणारी कडकडाती थंडी या एकत्रित समीकरणामुळे द्राक्षांना कमी बाजार भाव प्राप्त होत असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे आगामी काळात वातावरणात अनुकूल बदल घडतील अशी आशा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आहे, आणि तदनंतर द्राक्षांना चांगला बाजारभाव प्राप्त होईल असे देखील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे म्हणणं आहे.

English Summary: nashiks grapes export to uk and dubai Published on: 15 January 2022, 09:27 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters