कोरोनानंतर सध्या सहकारी संस्था, कारखाने यांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. यामुळे राजकारण तापले आहे. असे असताना आता शिरूर येथील घोडगंगा साखर कारखान्यांच्या (Ghodganga Sugar Mill) संचालकांनी कारखान्याची प्रारूप मतदार यादी (Voter List Draft) जाहीर केली आहे. यामध्ये मात्र एक धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामध्ये अनेक मृत सभासदांची नावे या यादीत आहेत. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. मृतांची नावे कमी झाल्यानंतर त्यांच्या जागी वारसांची नोंद होणे आवश्यक आहे, असे असतानाही कारखाना प्रशासनाने मृत सभासदांचा सर्व्हे केला नाही. यामुळे गोंधळ उडाला आहे. यामुळे आता प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर हजारो सभासदांनी त्यासाठी अर्ज केले आहेत. त्यांच्या अर्जाचा विचार करावा, अन्यथा उच्च न्यायालयात याबाबत रिट याचिका दाखल केली जाईल, असा इशारा घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे नेते दादा पाटील फराटे यांनी दिला.
यामुळे हा मुद्दा येणाऱ्या काळात चांगलाच तापणार आहे. कारखान्याच्या प्रारूप मतदार यादीवर हरकत घेताना मृत सभासदांच्या वारसांच्या नोंदी करून त्यांना सभासदत्व द्यावे, अन्यथा हा मुद्दा घेऊन आम्हाला उच्च न्यायालयात जावे लागेल, असा इशारा घोडगंगा किसान क्रांती पॅनेलच्या नेत्यांनी दिला. यामुळे आता काय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
चांदुरच्या तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण, कांदा प्रश्नाबाबत शेतकरी आक्रमक
यामुळे आगामी निवडणूकीत हा मुद्दा देखील महत्वाचा ठरणार आहे. हा कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. आता विरोधकांनी जोरदार तयारी केली असून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यात अनेक कारखान्यांची मुदत संपली आहे. यामुळे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र, साखर कारखान्यांबाबत म्हणाले..
मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे निश्चित, अनेकांना धक्का
कौतुकास्पद! 'फार्मर प्रोड्युसर'द्वारे पुरंदरचे जगात नाव, तरुणांनी करून दाखवले..
Share your comments