1. बातम्या

मुकेश अंबानी आहेत आंब्याचे मोठे निर्यातदार; शेतकऱ्यांनाही होतोय फायदा

रिलायन्स इंडस्ट्रीज जी देशातील सर्वात मोठी आणि नामाकिंत कंपनी आहे. अशा मोठ्या आणि नामाकिंत कंपनीचे मालक मुकेश अंबानी हे आंब्याचे मोठे निर्यातदार आहेत. त्यांचा रिलायन्सचा बिझनेस इतर अनेक क्षेत्रात विस्तारलेला आहे. त्यांच्या जामनगरच्या रिलायन्स कंपनीत आंब्याची बाग आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
बाग तब्बल 600 एकरवर पसरलेली आहे.

बाग तब्बल 600 एकरवर पसरलेली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज जी देशातील सर्वात मोठी आणि नामाकिंत कंपनी आहे. अशा मोठ्या आणि नामाकिंत कंपनीचे मालक मुकेश अंबानी हे आंब्याचे मोठे निर्यातदार आहेत. त्यांचा रिलायन्सचा बिझनेस इतर अनेक क्षेत्रात विस्तारलेला आहे. त्यांच्या जामनगरच्या रिलायन्स कंपनीत आंब्याची बाग आहे. याची बहुतेकांना कल्पनाही नसेल. ही बाग तब्बल 600 एकरवर पसरलेली आहे.

या बागेत आंब्यांची दीड लाखांहून अधिक झाडे असून यात 200 देशी-विदेशी आंब्यांचे प्रकार तसेच झाडेदेखील आहेत. यातील काही आंब्यांची गणना ही जगातील चांगल्या दर्जाच्या आंब्यांमध्ये केली जाते. गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्सची रिफायनरी आहे. ही रिफायनरी जगातील पहिल्या क्रमांकावर आहे. यातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी रिलायन्सने आंब्यांची बाग लावली.

1998 साली या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. खरंतर या कंपनीमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. 1997 साली जेव्हा प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या वतीने त्यांना नोटीस पाठवली तेव्हा प्रदूषण रोखण्यासाठी कंपनीने अशी अनोखी शक्कल लढवली. यातून पर्यावरणाचे नुकसान टळले आणि सोबतच कंपनीलाही फायदा झाला.

600 एकर परिसरात पसरलेली ही आंब्याची बाग जगातील मोठ्या आंब्यांच्या बागांपैकी एक मानली जाते. या बागेसाठी कंपनीच्या डिसैलिटेशन प्लँटमधून पाणी येते. तसेच पाण्याचा किफायतशीर पद्धतीने वापर करण्यासाठी या बागेत वॉटर हार्वेस्टिंग आणि डीप इरिगेशन सारख्या पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. काही देशी प्रकारसोबतच फ्लोरिडातील टॉमी एटकिन्स, इस्रायलमधील लिली, केईट आणि माया सारख्या विदेशी आंब्याचे प्रकारही येथे आहेत.

नुकसान भरपाईचे दावे न्यायालयात अडकले; 3 लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित

या बागेत तयार होणारे आंबे हे अनेक देशात निर्यात केले जातात. तसेच आंब्यांची मागणी परदेशात राहणाऱ्या गुजराथी समाजात प्रचंड असल्याचे सांगितले जात आहे. जामनगरच्या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांनाही या बागेत वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे या बागेची बरीच चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेतीचा वाद बरा नव्हे; मुलांनीच केली जन्मदात्या पित्याची हत्या
ऐन हंगामात खताची टंचाई; शेतकऱ्यांची वाढली चिंता

English Summary: Mukesh Ambani is a major exporter of mangoes; Farmers are also benefiting Published on: 03 July 2022, 06:04 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters