बिपरजॉय चक्रिवादळाचा मोठा फटका हा मान्सूनच्या वाटचालीला बसला. त्यामुळे मान्सूनची प्रगती मंदावली. यामुळे मान्सून लवकर येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सामान्यपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनपर्यंत पोहोचतो.
असे असताना मात्र यंदा मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी एक आठवडा उशिर झाला. असे असताना एक दिलासादायक बातमी आली आहे. आता मान्सूनबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे.
पुढील 72 तासांत मान्सून उर्वरीत महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. बिपरजॉय चक्रिवादळाचा मोठा फटका हा मान्सूनच्या वाटचालीला बसला. यामुळे चिंता वाढली होती.
शेतकऱ्यांनो पेरण्यांची घाई नको, कृषी विभागाचा सल्ला, जाणून घ्या..
मान्सूनला विलंब झाल्याने यंदा त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. पेरण्याला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून चक्रिवादळाच्या प्रभावामुळे झाला आहे.
शेतकऱ्यांनो असा कराल खतांचा कार्यक्षम वापर, जाणून घ्या..
दरम्यान, पाऊस लांबल्यामुळे शेतीची कामे रखडली आहेत. यामुळे आता पाऊस कधी पडेल आणि शेतीची कामे कधी होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या शेतकरी पावसाची वाट बघत आहेत.
ऊस वाहतुकदारांची ऊस तोडणी मुकादमांकडून होणाऱ्या फसवणुकीवर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, फसवणुकीवर बसणार आळा
जनावरांना चाऱ्यामधून होतेय विषबाधा, जाणून घ्या कशी घेयची काळजी...
शेतकऱ्यांनो असा कराल खतांचा कार्यक्षम वापर, जाणून घ्या..
Share your comments